Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » साधना इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रतिभा गुरव यांना ‘सातारा शिक्षक रत्न पुरस्कार २०२६’

साधना इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रतिभा गुरव यांना ‘सातारा शिक्षक रत्न पुरस्कार २०२६’

साधना इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्रतिभा गुरव यांना ‘सातारा शिक्षक रत्न पुरस्कार २०२६’

सातारा : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने योगदान देणाऱ्या यशोदा शिक्षण संस्था संचलित साधना इंग्लिश मीडियम स्कूल, सातारा येथील शिक्षिका प्रतिभा वैभव गुरव यांना प्रतिष्ठेचा ‘सातारा शिक्षक रत्न पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला.

माध्यमिक उपशिक्षण अधिकारी दत्तात्रय गिरी आणि प्राथमिक उपशिक्षण अधिकारी हणमंत यादव यांच्या हस्ते सौ. प्रतिभा वैभव गुरव यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न तसेच सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून केलेल्या कार्याची दखल घेत त्यांचा हा गौरव करण्यात आला.

पुरस्कार वितरण सोहळ्यास सिनेअभिनेते संतोष पाटील, लायन्स क्लबचे अध्यक्ष सचिन काळे, आइन्स्टाईन अकॅडमीचे अध्यक्ष पंडित, तसेच इन्स्पायर मानक अवॉर्डचे राज्य समन्वयक लक्ष्मण उबाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सौ. प्रतिभा वैभव गुरव यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल यशोदा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे आणि उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच साधना इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली धुमाळे, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनीही त्यांचे कौतुक करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सौ. प्रतिभा गुरव यांना मिळालेला हा सन्मान त्यांच्या शैक्षणिक कार्याची पावती असून, त्यांच्या कार्यामुळे साधना इंग्लिश मीडियम स्कूलच्या शैक्षणिक गुणवत्तेला आणि यशोदा शिक्षण संस्थेच्या विद्यार्थी-केंद्रित शैक्षणिक उपक्रमांना निश्चितच अधिक बळ मिळाले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाईत विकास अण्णा शिंदे मित्र परिवाराची भव्य दहीहंडी उत्साहात

वाईत विकास अण्णा शिंदे मित्र परिवाराची भव्य दहीहंडी उत्साहात वाई: सातारा जिल्हा परिषद सदस्य बापूसाहेब शिंदे यांच्या वतीने युवा नेते

Live Cricket