अफझल खान कबर परिसरात 163 कलम लागू राज्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार; परतीच्या प्रवासासाठी पोषक वातावरण अभियांत्रिकी शिक्षणाला नव्या युगाची दिशा देणारा यशोदा टेक्निकल कॅम्पस : अभियंता दिनाच्या निमित्ताने नवोन्मेष, उद्योगाभिमुखता आणि उद्याच्या तंत्रज्ञानाची वाटचाल भारतीय भाषांच्या सन्मानातूनच ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ची संकल्पना साकार होईल – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन पाटखळमध्ये बीम लाईट व डॉल्बीचा वापर; डबेवाडीत विनापरवाना डॉल्बी वाद्यासह मिरवणूक — दोन स्वतंत्र गुन्हे दाखल
Home » राज्य » प्रशासकीय » साताऱ्यातील आरक्षित जागेवर बेकायदा बांधकाम युसूफ कच्छी यांची तक्रार : जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन सातारा नगरपालिका प्रशासनाचे झोपेचे सोंग

साताऱ्यातील आरक्षित जागेवर बेकायदा बांधकाम युसूफ कच्छी यांची तक्रार : जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन सातारा नगरपालिका प्रशासनाचे झोपेचे सोंग

साताऱ्यातील आरक्षित जागेवर बेकायदा बांधकाम युसूफ कच्छी यांची तक्रार : जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन

सातारा नगरपालिका प्रशासनाचे झोपेचे सोंग?

साताऱ्यात आरक्षित जागेवर बेकायदा बांधकाम तक्रार करूनही जोमातकाम सुरु असल्याचा आरोप; युसूफ कच्छी यांची कारवाईची मागणी

सातारा : बुधवार पेठ येथील सि.स. नं. २७३ मधील सुमारे १०११.७१ चौ.मी. क्षेत्रफळाच्या आरक्षित जागेवर अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचा आरोप करत युसूफ कच्छी यांनी सातारा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. परंतु संबंधित बांधकाम तातडीने थांबवून ते काढण्यात यावे तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. परंतु त्या ठिकाणी सध्या काम जोरात सुरू असल्याचे निदर्शनात येत असल्याची माहिती कच्छी यांनी दिली.

कच्छी यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित मिळकतीचे मूळ मालक कै. बाबासाहेब गोरे यांच्यासोबत २०१३ मध्ये विसार पावतीचा व्यवहार झाला असून, त्यातून सदर मिळकत खरेदी करण्याचा कायदेशीर हक्क प्राप्त झाल्याचा त्यांचा दावा आहे. मात्र, गोरे यांच्या वारसांनी हा हक्क डावलून संबंधित मिळकत प्रविण निवास पाटील यांना विकल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

या व्यवहाराविरोधात न्यायालयात खटला दाखल असून प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, संबंधित मिळकत सातारा पालिकेच्या मंजूर विकास योजनेनुसार आरक्षित असल्याने त्या ठिकाणी खाजगी अथवा व्यावसायिक स्वरूपाचे बांधकाम करणे नियमबाह्य असल्याचा दावा कच्छी यांनी केला आहे.

आरक्षित जागेवर कोणतीही परवानगी न घेता बांधकाम सुरू करण्यात आल्याची तक्रार त्यांनी केली आहे. बांधकामास हरकत घेत ते थांबविण्याची मागणी केली असता आपल्याला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचाही आरोप त्यांनी निवेदनात केला आहे.

आरक्षणाचा भंग, न्यायालयीन वाद प्रलंबित असताना करण्यात येणारे कथित अनधिकृत बांधकाम आणि इतर नियमभंगांची चौकशी करून संबंधित बांधकाम पाडण्यात यावे व दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी युसूफ कच्छी यांनी सातारा पालिकेकडे केली आहे. या संदर्भातील निवेदन कलेक्टरना ही देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket