महिला सक्षमीकरणासह सहकाराचा अनुभव; अल्पना यादव यांची डीसीसी बँकेसाठी उमेदवारी गायिकांनी गायनासोबत लेखन, वाचनातूनही व्यक्तिमत्त्व समृद्ध करावे : शिरीष चिटणीस पुस्तकांच्या गावात ‘मराठीचे अद्वैतरंग’अभिजात मराठीचा अभिमान, ‘मराठीचे अद्वैतरंग’ चा रंगमंचीय संगीतमय सांस्कृतिक कार्यक्रम महात्मा गांधी जयंतीनिमित्त वेण्णा लेक परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात; ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत जलस्रोतांच्या रक्षणाचा संदेश महाबळेश्वरमध्ये पर्यटन वाढ आणि सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाकडून हॉटेल व आस्थापना चालकांची आढावा बैठक; सायबर सुरक्षा आणि C-Form नोंदणीबाबत स्पष्ट सूचना कोलगेट पामोलिव्हच्या जागतिक विभाग प्रमुख पदी साताऱ्यातील प्रितेश सपकाळ यांची नियुक्ती, सिनियर डायरेक्टर पदी बढती. 
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » बँकिंग » सातारा जिल्हा बँकेला राजकारणापासून दूर ठेवा; खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजेंचे आवाहन

सातारा जिल्हा बँकेला राजकारणापासून दूर ठेवा; खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजेंचे  आवाहन

सातारा जिल्हा बँकेला राजकारणापासून दूर ठेवा; खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजेंचे आवाहन

सातारा प्रतिनिधी -सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. येत्या पंधरा दिवसांत प्रत्यक्ष निवडणुक प्रक्रीया सुरु होत आहे. आजपर्यंत दिग्गजांच्या नेतृत्वाखाली डिसीसी बॅंक ही राजकारण विरहित शेतकरी-सभासद केंद्रबिंदू मानून वाटचाल करीत आहे. सातारा डिसीसी बँक ही देशात एक आदर्श बॅंक म्हणून नाबार्डसह अनेक पातळयांवर नावाजली गेली आहे. या पार्श्वभुमीवर शेतकरी-सभासद, ठेवीदार,कर्जदार, सामान्य खातेदार, नागरीक आणि बॅंकेचा कणा असलेल्या सेवकवृंदाच्या हितासाठी ही संचालक निवडणुक वैयक्तिक किंवा पक्षीय राजकारण विरहीत करण्यासाठी सर्व संबंधीतांनी आपले बहुमूल्य योगदान दयावे असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक तथा सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुका नजीकच्या काळात होवू घातल्या आहेत. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे नेतृत्व करताना अनेक दिग्गजांनी राजकारणाचे जोडे बाजुला ठेवून, जिल्हा बॅंकेचे व्यवस्थापन पाहीलेले आहे. सेवकवर्गानेही आपले सर्वोच्य योगदान बॅंकेच्या प्रगतीकरीता दिले आहे. त्यामुळेच सातारा डिसीसी बॅंक ही जिल्हयातील शेतक-यांची खरी अर्थवाहीनी ठरली आहे. शेतकरी हिताला प्राधान्य देत उच्य दर्जाची बॅंकींग सेवा बॅंकेच्या सुमारे ३१७ शाखांच्या माध्यमातुन दिली जात आहे. ६७ एटिएम, २ विस्तारीत शाखा, ६५० मायक्रो एटीएम, ऑनलाईन सुविधा बॅंकेने पुरवून शेतकरी-खातेदार, ठेवीदार यांच्या गरजेला सहकार्यांचा हात देत, त्यांच्या आर्थिक जीवनाला एक आयाम दिला आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळवले आहेत इतकेच नव्हे तर बँकेचा सतत 19 वर्षे निव्वळ एन.पी.ए सातत्याने झिरो परसेंट राहीलेले आहे. बॅंकेची कर्ज वसुली ९५ टक्क्यांहुन अधिक आहे. राज्यातील ३१ जिल्हा मध्यवर्ती बँकापैकी बऱ्याचश्या सहकारी बँकांमध्ये राजकारण शिरल्यावर एक तर त्या बॅंका नावालाच उरल्या किंवा त्यांची विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची उदाहरणे आपल्याला दिसून येतील. सहकार क्षेत्रात, त्यातही सहकारातील आर्थिक संस्थेमध्ये काम करताना राजकारणाचा चष्मा किंवा राजकारणाचे जोडे हे बाहेरच ठेवणे अत्यंत आवश्यक ठरते. त्यास अनुसरुनच “ एकमेका सहाय्य करु अवघे धरु सुपंथ ” या वचन-उक्तीप्रमाणे सर्वांच्या सहकार्याने, सहभागाने आणि समान विचारेने सातारा जिल्हा बॅंकेने गेल्या अनेक दशकांपासून केलेली नेत्रदिपक प्रगती निश्चितच अतुलनीय- प्रेरणादायी आहे. 

या पार्श्वभुमीवर सातारा जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाच्या होवू घातलेल्या निवडणुकीत केवळ आणि केवळ शेतकरी खातेदार इत्यादींचे सर्वांगिण हित डोळयासमोर ठेवून, राजकारण विरहीत करण्यासाठी सर्वांनी आपल्या परीने योगदान दयावे असे आवाहन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले असून, बॅंकेची निवडणुक सर्वांना बरोबर घेवून शेतक-यांच्या हितासाठी राजकारण विरहीत झाली पाहीजे जेणेकरुन सातारा जिल्हयाची वैचारिक सहकार संस्कृती पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित होईल. आज शेतकारी- कष्टक-यांनी सर्व लोकप्रतिनिधींना आपले समजून वेळोवेळी सहकार्य केले आहे. आज शेतक-यांसाठी शेतक—यांची ही बॅन्क राजकारण विरहीत राहील असे कृतीमधुन आपण दाखवून दिले पाहीजे असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रसिध्दीपत्रकात नमुद केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महिला सक्षमीकरणासह सहकाराचा अनुभव; अल्पना यादव यांची डीसीसी बँकेसाठी उमेदवारी

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी अल्पना प्रताप यादव यांचा अर्ज दाखल वाई : वाई तालुक्यातील सौ.अल्पना प्रताप यादव यांनी सातारा

Live Cricket