Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » सहकार भूषण” धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने चार चाकी वाहनासाठी कर्जवितरण .

सहकार भूषण” धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने चार चाकी वाहनासाठी कर्जवितरण .

सहकार भूषण” धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने चार चाकी वाहनासाठी कर्जवितरण 

कोरेगाव -सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्थेच्या अत्यल्प व्याजदर व सुलभ कर्ज योजनांमुळे सभासदांमध्ये समाधान आहे . सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक आधार देण्याचे ब्रीद घेऊन कार्यरत असलेल्या धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सातारा या पतसंस्थेने कमी व्याजदराने व सुलभ प्रक्रियेद्वारे सहकाराच्या माध्यमातून कर्ज वितरणाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. कोरेगांव शाखेच्या वतीने श्री. संकेत कुटोळे यांना टाटा Nexson -Creative वाहन तारण कर्जाचे वितरण संस्थेच्या संचालिका डॉ. सौ . सारिका मस्कर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. डॉ. रविंद्र भोसले ,व्हा. चेअरमन डॉ. कांत फडतरे व संस्थेचे सर्व संचालक डॉ.अरविंद काळे डॉ. शिरीष भोईटे,,डॉ,शकिल अतार, डॉ,हेमंत शिंदे , डॉ. राजेंद्र जाधव ,डॉ. अभिजित भोसले ,डॉ,श्रीरंग डोईफोडे ,डॉ. जयदीप चव्हाण ,डॉ. सौ हर्षला बाबर,डॉ,नारायण तांबे ,डॉ.सुनिल कोंडगूले, ॲड. श्री सूर्यकांत देशमुख तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी – श्री . संजय पवार , उपमुख्य कार्यकारी अधिकारी – श्री.श्रीहरी डिंगणे,सह.उपमुख्य कार्य.अधिकारी सौ. अलका मुरूमकर ,शाखाधिकारी – अर्जुन नांगरे व कर्मचारी वर्ग उपस्थित होते .

संस्थापक -चेअरमन मा . डॉ. रविंद्र भोसले यावेळी म्हणाले की, “धन्वंतरी पतसंस्था फक्त नफ्यासाठी नाही तर सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी व त्यांच्या हितासाठी कार्य करते .इतर बँकांच्या तुलनेत धन्वंतरी पतसंस्थेचे अत्यल्प व्याजदर व कागदपत्रांची पूर्तता कमीत कमी वेळेत करून तात्काळ कर्ज मंजूर केले जाते. संस्थेचे सर्व व्यवहार पारदर्शक असून कर्जासाठी कोणतेही छुपे शुल्क घेतले जात नाही.कर्ज हप्ता व व्याजाची संपूर्ण माहिती आधीच दिली जाते. वाहन तारण, गृह कर्ज, सोने तारण, व्यवसाय कर्ज, प्रॉपर्टी खरेदी ,मशीनरी खरेदी अशा विविधकर्ज योजना अल्प व्याजदारमद्धे धन्वंतरी पतसंस्था राबवत आहे . याचा लाभ सर्वानी घ्यावा असे आवाहन मा. चेअरमन मा. डॉ. रवींद्र भोसले यांनी केले व श्री. नांगरे यांना शुभेच्छा दिल्या.

संस्थेचे व्हा. चेअरमन डॉ. मा .कांत फडतरे म्हणाले कि ,धन्वंतरी पतसंस्थेचे व्याजदरही इतर बँकांच्या तुलनेने कमी आहेत . शिवाय कर्जदाराने नियमित परतफेड केल्यास व्याजदरात १ % रिबेट मिळतो ,ही सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बाब आहे. धन्वंतरी पतसंस्थेने आजपर्यंत रु. 203 कोटी ठेवी, रु. 160 कोटीपेक्षा जास्त कर्जवाटप, रु 106 कोटी गुंतवणूक ,शून्य टक्के एनपीए ठेवला आहे. 98% वसुलीमुळे संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम असून नफ्यातील हिस्सा सभासदांना लाभांश रूपाने परत दिला जातो . यावर्षीही संस्थेने सभासदाना १२% लाभांश दिला आहे.

श्री. संकेत कुटोळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि ,अल्प व्याजदर आणि त्वरित कर्जमजुरी अशी “सुलभ कर्ज प्रक्रिया हीच ओळख संस्थेची असल्याने व इतर ठिकाणी कर्जासाठी हेलपाटे मारावे लागतात. परंतु धन्वंतरी पतसंस्थेत शाखाधिकाऱ्यांनी स्वतः मार्गदर्शन करून सुलभ पद्धतीने प्रक्रिया केली . धन्वंतरीच्या या विश्वासार्ह व आपुलकीच्या सेवेबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. संस्थेकडून अनेक व्यक्ति कर्ज घेऊन आपली प्रगती करून घेत आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. दिनेश धुमाळ यांची बिनविरोध निवड

वाई बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. दिनेश धुमाळ यांची बिनविरोध निवड वाई : अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, वाई येथील वकील

Live Cricket