शेतक-यांनी रब्बी ज्वारी, हरभरा व मका बियाणेसाठी अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन
सातारा : कृषी उत्पादकतेमध्ये वाढ करण्यासाठी रब्बी हंगाम २०२६-२७ साठी सातारा जिल्हयात राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान तसेच कडधान्य आत्मनिर्भरता अभियान अंतर्गत रब्बी ज्वारी, मका व हरभरा पिकांचे पिक प्रात्याक्षिकांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सदर योजनांतर्गत प्रमाणित बियाणांचे अनुदानावर वितरण केले जाणार आहे.
तरी रब्बी हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकरी गटांनी रब्बी ज्वारी, हरभरा व मका पिकांच्या पीक प्रात्याक्षिके तसेच वैयक्तीक शेतक-यांनी रब्बी ज्वारी, हरभरा व मका या पिकांचे प्रमाणित बियाणे या घटकासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin या संकेतस्थळावर अर्ज करावेत व योजनांचा लाभ घ्यावा, असे अवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.





