Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या नागरिकांनी भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियानाचा लाभ घ्यावा

विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या नागरिकांनी भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियानाचा लाभ घ्यावा

विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या नागरिकांनी भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियानाचा लाभ घ्यावा

सातारा :- राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या अभियानांतर्गत राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या नागरिकांना शासनाच्या विविध योजना, आवश्यक ओळखपत्रे व प्रमाणपत्रांचा लाभ सुलभतेने उपलब्ध करून देण्यासाठी ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान ही विशेष मोहिम दि. २७, २८ व २९ सप्टेंबर २०२६ रोजी राबविण्यात येत आहेत व त्यानंतरचे नियमित अभियान प्रत्येक तिमाहीच्या पहिल्या मंगळवारी घेण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत सातारा जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या नागरिकांसाठी मंडळ व तालुकास्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.  

विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या नागरिकांची भटकंतीची जीवनशैली लक्षात घेऊन शासनाच्या विविध योजना तसेच मूलभूत हक्कांशी संबंधित आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. तरी सातारा जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या पात्र नागरिकांनी संबंधित तालुका व मंडळस्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष शिबिरांच्या ठिकाणी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे आणि शासनाच्या विविध योजना, सेवा व प्रमाणपत्रांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. दिनेश धुमाळ यांची बिनविरोध निवड

वाई बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. दिनेश धुमाळ यांची बिनविरोध निवड वाई : अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, वाई येथील वकील

Live Cricket