वाई येथे देशभक्त किसन वीर यांची जयंती साजरी
वाई प्रतिनिधी – वाई तालुक्याचे भाग्यविधाते कै. आबासाहेब तथा किसन वीर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वाई नगरपरिषद व शहरातील मुख्य चौकात अभिवादन करण्यात आले. यावेळी वाई नगरपरिषदेने शहरातील मुख्य चौकात देशभक्त किसन वीर चौक असा बोर्ड लावावा, अशी मागणी वाईतील समस्त नामदेव शिंपी समाज संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
कै. किसन वीर यांना अभिवादन करणेसाठी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते वाई नगरपरिषद कार्यालय व किसन वीर चौकात जमले होते. नगरपरिषद कार्यालयात झालेल्या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष घनश्याम चक्के व मान्यवरांच्या हस्ते किसन वीर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी समस्त नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष डाँ. मकरंद पोरे, उपाध्यक्ष अजित वनारसे, विश्वस्त अतुल वाईकर, वाई अर्बन बँकेचे संचालक प्रीतम भुतकर, प्रसाद महाडिक, सारंग बाचल, चंदन परदेशी, उमेश मुळे, प्रसाद चौगुले, संदीप बाचल, प्रकाश मांढरे, हरिश्चंद्र माळवदे, चंद्रशेखर वनारसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी संजय गायकवाड आदी उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थितांनी किसन वीर यांचे जीवन चरित्रावरील आठवणी सांगितल्या. किसन वीर हे वाई तालुक्याला लाभलेले प्रभावी नेतृत्व होते. त्यांच्यामुळे वाई तालुक्याचा सर्वांगीन विकासाचे परिवर्तन सुरू झाले. आबांचे कल्पक नेतृत्व, त्यांचे विचार सर्व समाजाला व तालुक्याला प्रेरणादायी असे आहेत. किसन वीर आबा हे वाई तालुक्याचे भाग्यविधाते आहेत, अशा शब्दांत उपस्थितांनी त्यांना आदरांजली वाहीली.




