Home » राज्य » शेत शिवार » वाई तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा. वाई तालुका काँग्रेस कमिटीची मागणी.

वाई तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा. वाई तालुका काँग्रेस कमिटीची मागणी.

वाई तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा. वाई तालुका काँग्रेस कमिटीची मागणी.

वाई प्रतिनिधी -वाई तालुक्यातील शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली असून, पावसाअभावी उभी पिके करपून गेली आहेत. पाऊस कमी झाल्यामुळे विहिरींमधील पाण्याची पातळीही तळाला गेली आहे. वाई तालुक्यात धोमसारखे मोठे धरण असूनही त्याचे पाणी खंडाळा, फलटण, बारामती व कोरेगाव या भागांकडे जात आहे.

शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून वाईचे नाव वगळण्यात आले आहे. हा वाई तालुक्यातील शेतकऱ्यांवर शासनाने केलेला अन्याय असल्याचे वाई तालुका काँग्रेस कमिटीने म्हटले आहे.

या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वाई तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने दिनांक ७ ऑक्टोबर रोजी वाईचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी वाई तालुका अध्यक्ष विलास पिसाळ, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष जयदीप शिंदे, सातारा जिल्हा सेवा दलाचे अध्यक्ष प्रताप देशमुख, तालुका उपाध्यक्ष संतोष गायकवाड, शरद पनवेलकर, प्रकाश शिंदे, ओबीसी विभागाचे अध्यक्ष प्रवीण क्षीरसागर, सेवा दलाचे अध्यक्ष काशिनाथ पिसाळ, उपाध्यक्ष नामदेवराव दौंड, मागासवर्गीय विभागाचे अध्यक्ष संभाजी कांबळे, ज्येष्ठ कार्यकर्ते हनुमंतदादा पिसाळ, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अजिंक्य देशमुख, जिल्हा युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष विहार पावस्कर, धनंजय पिसाळ, संभाजी पिसाळ, संतोष गायकवाड, वाई विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन काटे तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सहकारभूषण’ धन्वंतरी पतसंस्थेतर्फे धन्वंतरी पुरस्कार जाहीर

‘सहकारभूषण’ धन्वंतरी पतसंस्थेतर्फे धन्वंतरी पुरस्कार जाहीर सातारा : सहकार क्षेत्रात संपूर्ण राज्यात आदर्श असणाऱ्या सहकारभूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था कला,

Live Cricket