वाईत विकास अण्णा शिंदे मित्र परिवाराची भव्य दहीहंडी उत्साहात
वाई: सातारा जिल्हा परिषद सदस्य बापूसाहेब शिंदे यांच्या वतीने युवा नेते विकास अण्णा शिंदे यांच्या मित्र परिवारातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य दहीहंडी उत्सव पारंपरिक थाटात व मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी दहीहंडीसाठी १ लाख ५१ हजार १११ रुपयांचे वाई शहरातील सर्वाधिक बक्षीस ठेवण्यात आले होते.
वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य बापूसाहेब शिंदे, पंचायत समितीचे सभापती भैय्यासाहेब डोंगरे, विकास शिंदे, प्रवीण शिंदे, वसंत तुपे, शरद विटकर, काशिनाथ चोरट, रमाकांत यादव, शाम चावलानी, नाना पिसाळ, तरुण शिंदे, तनिश शिंदे ,त्रिशिव शिंदे आदी उपस्थित होते.
सिद्धेश्वर क्रीडा मंडळ व ग्रामस्थ मंडळ, सिद्धनाथवाडी यांनी उत्कृष्ट समन्वय व चिकाटी दाखवत दहीहंडी फोडण्याचा मान पटकावला. ढोल-ताशांच्या गजरात व जल्लोषात पार पडलेल्या या सोहळ्याला वाईकरांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे स्वागत व आभार विकास शिंदे यांनी मानले. उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रणव थोरवे, दादासाहेब काळे, दत्तात्रय वाडकर, धीरज ओसवाल, उमेश माने, राजेश कावडे, नितीन चोरट, सचिन वायदंडे, पांडुरंग वरे, दत्तात्रय पोळ, सोपान चिकणे, धनंजय चव्हाण, बबलू मुलाणी, तुकाराम तुपे, अमीन वनारसे, धनंजय मुलीय, अमोल चोरट, रवी मोझर, स्वप्नील त्रिंबके, प्रथमेश ढोणे आदींनी परिश्रम घेतले.




