राष्ट्रीय थाई बॉक्सिंग स्पर्धेत सातारा वाई संघाचे घवघवीत यश
वाई (संजीव वरे -) वाई छत्तीसगड, रायपूर येथील इंदिरा गांधी युनिव्हर्सिटी येथे दिनांक पडलेल्या राष्ट्रीय थाई बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्र संघाने प्रथम क्रमांक पटकविला या स्पर्धेत वाईतील ज्ञानदीप स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सेंट थॉमस हायस्कूल वाई दिशा पब्लिक स्कूल वाई नगरपालिका पाच नंबर शाळा वाई व किसन किसनवीर कॉलेज वाईच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शिरपेचात मानाचा तुरा रोवला.
या स्पर्धेचा बक्षीस समारंभ छत्तीसगडचे मंत्री श्री ब्रजभूषण अगरवाल व थाय बॉक्सिंग चे राष्ट्रीय अध्यक्ष अत्तार सर यांच्या हस्ते पार पडला या स्पर्धेत सातारा जिल्ह्याने सुवर्णपदक 6 रौप्यपदक 3 कांस्य पदक 8विजेते खेळाडू सना वजीर शेख सुवर्णपदक किसनवीर कनिष्ठ महाविद्यालय वाई अलीमोहम्मद वजीर शेख सुवर्णपदक सेंट थॉमस हायस्कूल शिवम संदीप गायकवाड सुवर्णपदक ज्ञानदीप स्कूल अन्वय विनोद पडवळ सुवर्णपदक ज्ञानदीप स्कूल दिग्विजय दत्तात्रेय सुर्वे सुवर्णपदक . एलिना सचिन शिंदे राजवीर किरण राठोड स्वराज विनायक शिंदे कांस्यपदक तनिष्का सचिन पोफळे सई संदीप मानकुमरे दर्श अविनाश गायकवाड शंभू सहदेव कामटे अथर्व दीपक फाळके मोहित रोहित कारमोर अनिरुद्ध किरण राठोड जमीर नालबंद या वाईच्या सर्वांनी पदके मिळवली.
या सर्वांना क्रीडा शिक्षक सचिन लेंबे सर रविराज गाढवे सर शिवराज वरे सर वजीर शेख सर सफिया शेख अक्षय साळुंखे अशोक कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले या सर्व गुणवंत खेळाडूंचे पंचायत समिती सभापती पैलवान विक्रांत (भैय्या) डोंगरे युवा नेते विजयसिंह भैया पिसाळ ज्ञानदीप स्कूलच्या प्राचार्य शुभांगी पवार सेंट थॉमस स्कूल प्राचार्य उषा रुपेश सिंग सामाजिक कार्यकर्ते पैलवान तानाजी कचरे रुपेश सिंग सर यांनी अभिनंदन केले.




