मानेवाडी जि.प. शाळेसाठी १ एकर जमिनीचे दान; दानशूर जाधव बंधूंचा गटविकास अधिकाऱ्यांकडून गौरव
फलटण प्रतिनिधी -जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मानेवाडीच्या नूतन इमारतीसाठी तसेच शाळेचे मैदान व अन्य शैक्षणिक सुविधांसाठी मानेवाडी येथील दानशूर जाधव कुटुंबीयांनी मोठ्या मनाचा परिचय देत स्वखुशीने व विना मोबदला १ एकर जमीन बक्षीसपत्र करून शाळेस दान दिली आहे.
शाळेसाठी जमीन दान करणारे थोर देणगीदार (सत्कारमूर्ती) :
१) श्री. पंढरीनाथ लक्ष्मण जाधव
२) श्री. शीलानाथ एकनाथ जाधव
३) श्री. सावता हनुमंत जाधव
४) श्री. रामचंद्र जगन्नाथ जाधव
५) श्री. नारायण लक्ष्मण जाधव
(सर्व रा. मानेवाडी, ता. फलटण, जि. सातारा)
या उदात्त कार्याबद्दल फलटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा. श्री. घावटे साहेब यांच्या शुभहस्ते या पाचही देणगीदारांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
पाठपुरावा व विशेष सहकार्य :
हे पुण्याचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी गावचे सरपंच श्री. राजेंद्र शामराव जाधव व श्री दत्तगुरु दूध संकलन केंद्राचे चेअरमन श्री. कीर्तीकुमार बनकर साहेब श्री संतोष जाधव सर दालवडी हायस्कूल यांनी विशेष पाठपुरावा व सहकार्य केले.
सत्कार प्रसंगी उपस्थित मान्यवर :
यावेळी गावचे उपसरपंच श्री. मच्छिंद्र कदम शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सचिन तात्याबा जाधव श्री. वसंत रामचंद्र माने सर, श्री बाजीराव बाबुराव जाधव सर श्री. मनोज कदम, श्री. जगन्नाथ बाबुराव जाधव, माजी पोलीस पाटील श्री. संदीप बाबा जाधव गटशिक्षणाधिकारी श्री. मठपती साहेब, केंद्रप्रमुख,श्री. दडस साहेब मुख्याध्यापिका सौ. नलवडे मॅडम, उपशिक्षक श्री. धोत्रे सर, श्री. बनकर सर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दानामुळे शाळेच्या नवीन इमारतीचा व प्रशस्त मैदानाचा प्रश्न कायमचा सुटला असून विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जाधव परिवाराच्या या दातृत्वाचे संपूर्ण फलटण तालुक्यातून कौतुक होत आहे.





