महिला शेतकऱ्यांना मिळणार ओळख; महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पोर्टल झाले उपलब्ध

सातारा – राज्यातील महिला शेतकऱ्यांना अधिकृत मान्यता देऊन त्यांना विविध शासकीय योजना, कार्यक्रम, कृषी पतकर्ज, विमा, कृषी निविष्ठा व विस्तार सेवांचा लाभअधिक सुलभतेने मिळवून देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६ अंतर्गत महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठीचे ऑनलाइन पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://krishi.maharashtra.gov.in/ उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी दिली आहे.
सातारा जिल्ह्यातील पात्र महिला शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज https://uat-mahakrishi.mahaitgov.in/mahila-shetkari-service या लिंक द्वारे सादर करता येईल.अधिक माहितीसाठी नजीकचे सहाय्यक कृषि अधिकारी, उप कृषि अधिकारी यांचेशी संपर्क साधावा आणि या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही श्रीमती फरांदे यांनी केले आहे.




