गणेशाच्या भक्तीत रंगले भरतनाट्यम्; ‘नृत्य विनायक’ला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अत्याधुनिक २०० व्होल्वो बसेस एसटीच्या ताफ्यात – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक विकसित भारतासाठी राज्यांची आर्थिक क्षमता बळकट करणे आवश्यक – वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल खंडाळा तालुका प्राथमिक शिक्षक समितीचा शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न एसटीच्या सवलती प्राप्त प्रवाशांसाठी एनसीएमसी कार्ड नोंदणी व वितरण प्रक्रियेत बदल नदीपात्राच्या स्वच्छतेसाठी वाई NCC युनिटचा स्तुत्य उपक्रम गणेशमूर्तींच संकलन करून नगरपालिकेकडे सुपूर्द; नदीतील सूक्ष्मजीवसृष्टीच्या संरक्षणासाठी विद्यार्थ्यांचा पर्यावरणपूरक पुढाकार
Home » देश » धार्मिक » महाराष्ट्र सदनातील गणेशोत्सवास दिल्लीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सांस्कृतिक कार्यक्रमांसह खाद्य, कला व खरेदी दालनांवर झुंबड

महाराष्ट्र सदनातील गणेशोत्सवास दिल्लीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सांस्कृतिक कार्यक्रमांसह खाद्य, कला व खरेदी दालनांवर झुंबड

महाराष्ट्र सदनातील गणेशोत्सवास दिल्लीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सांस्कृतिक कार्यक्रमांसह खाद्य, कला व खरेदी दालनांवर झुंबड

नवी दिल्ली- राजधानी दिल्लीतील कोपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनात सुरू असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला दिल्लीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. श्री गणरायाच्या दर्शनासाठी दररोज शेकडो भाविकांची उपस्थिती लाभत असून, संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच सदनात उभारण्यात आलेली खाद्य, कला व प्रदर्शन-विक्री दालने नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत.

चव महाराष्ट्राची!’ अंतर्गत पुरणपोळी व उकडीचे मोदक, ‘कौशल्याला सलाम!’ उपक्रमांतर्गत दिव्यांग बांधवांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू तसेच ‘महाराष्ट्राच्या वस्त्रपरंपरेचा अनोखा ठेवा’ या उपक्रमातील पैठणी, माहेश्वरी व इरकल साड्यांच्या दालनांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे

याशिवाय महिला बचत गटांनी तयार केलेले चकली पीठ, ढोकळा पीठ, बारीक शेव, शेवभाजीसाठीची शेव आणि फराळी चिवडा तसेच वडापाव, चादरी आणि बांबू टॉवेल यांसारख्या विविध वस्तूंची प्रदर्शनी-विक्रीही नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. या उपक्रमातून महिला बचत गटांच्या कौशल्याला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबरोबरच महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन मिळत आहे.

गेल्या काही दिवसांतील यशस्वी कार्यक्रमांनंतर आता 20 सप्टेंबरपासून होणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांकडे रसिकांचे लक्ष लागले आहे. 20 सप्टेंबर रोजी जनपथ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेंटर येथे वैशाली सामंत, ऋषिकेश रानडे आणि शरयू दाते यांच्या उपस्थितीत ‘मराठी चित्रपट गीते’हा संगीत सोहळा रंगणार आहे. 21 सप्टेंबर रोजी ‘पाक कलाकृती स्पर्धा’आणि साध्वी जेठवानी यांचा ‘भरतनाट्यम’ नृत्य कार्यक्रम होणार आहे. 22 सप्टेंबर रोजी राजेंद्र क्षीरसागर प्रस्तुत ‘खेळ पैठणीचा’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 23 सप्टेंबर रोजी आकाशवाणी रंगभवन येथे प्रमिला लोदगेकर प्रस्तुत ‘लावणी’ कार्यक्रम, तर 24 सप्टेंबर रोजी मोनिका कपूर प्रस्तुत ‘बॉली बीट्स’ हिंदी-मराठी गायन व नृत्य सोहळा होणार आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

गणेशाच्या भक्तीत रंगले भरतनाट्यम्; ‘नृत्य विनायक’ला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गणेशाच्या भक्तीत रंगले भरतनाट्यम्; ‘नृत्य विनायक’ला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सातारा -श्री.उत्तर चिदंबरम् नटराज मंदिर आयोजित ” गणेश नृत्य संगीत महोत्सव”

Live Cricket