श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यात्रा उत्सवासाठी म्हसवड नगरी सज्ज सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून, यात्रा निर्विघ्नपणे पार पाडाव -ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे डॉ. नितीन देशपांडे यांना स्विस इंटरनॅशनल मॅनेजमेंट अकॅडमीकडून ‘डॉक्टरेट ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन’ पदवी प्रदान जागतिक वारसा सप्ताह आणि साताऱ्यातील वारसा आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेतून महाराष्ट्राच्या खेळाडूंना जागतिक संधी- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार पुण्यात इंडिया इंटरनॅशनल ओपन तायक्वांदो चॅम्पियनशिपचे उद्घाटन साधना इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 79 वा NCC दिवस उत्साहात साजरा कराडच्या संतोष पाटील आणि श्रीकांत वारे दिग्दर्शित “आरंभकडा” लघुपटाची शिवप्रहार राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत अधिकृत निवड; ९६ दर्जेदार लघुपटांमध्ये कराडच्या भूमिपुत्रांची बाजी
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » महाबळेश्वरमध्ये २९ सप्टेंबरला ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’; तहसीलदारांचे नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

महाबळेश्वरमध्ये २९ सप्टेंबरला ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’; तहसीलदारांचे नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

महाबळेश्वरमध्ये २९ सप्टेंबरला ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’; तहसीलदारांचे नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

​प्रतापगड :महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग व जिल्हाधिकारी सातारा यांच्या निर्देशानुसार १७ सप्टेंबर २०२६ ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यभरात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत महाबळेश्वर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान’ आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर मंगळवार, दिनांक २९ सप्टेंबर २०२६ रोजी खादी ग्रामोद्योग (मधसंचालनालय हॉल), महाबळेश्वर येथे होणार आहे, अशी माहिती महाबळेश्वरचे तहसीलदार श्री. सचिन मस्के यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.  

शिबिरात मिळणारे प्रमुख लाभ व सेवा:

​या शिबिराच्या माध्यमातून विविध शासकीय विभागांमार्फत नागरिकांना एकाच छताखाली अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने:  

▪️​महसूल व भूमी अभिलेख सेवा: प्रलंबित फेरफार नोंदींचा निपटारा करणे, जिवंत सातबारा मोहीम, ७/१२ व ८अ च्या नोंदी अद्ययावत करणे, जमिनीचे खरेदी-विक्रीचे व्यवहार जमिनीच्या मोजणीशी जोडणे, मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे आणि मालमत्ता कराची आकारणी व मागणी पत्र देणे.  

▪️दाखले व प्रमाणपत्रे: नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, जन्म-मृत्यू नोंद व प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, महिला शेतकरी प्रमाणपत्र देणे.  

▪️नागरी व कृषी सुविधा:गायठाणातील नागरिकांना स्वामित्व सनद वाटप करणे, ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते’ उपलब्ध करणे, पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे (रेशन कार्ड) वितरण, नवीन नळ जोडणी देणे, प्रलंबित घरगुती व कृषी वीज जोडणीस मंजुरी देणे आणि नवीन मालमत्ताधारकाचे नाव नोंदविणे.  

▪️​योजना व इतर लाभ:पात्र लाभार्थ्यांना वन हक्क दावे मंजूर करणे, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी, शिकाऊ वाहन चालक परवाना (Learner’s Driving License), महिला बचत गट नोंदणी इत्यादी सेवा दिल्या जातील.  

तहसीलदारांचे आवाहन:

​महाबळेश्वर तालुक्यातील सर्व शेतकरी, नागरिक आणि लाभार्थ्यांनी या शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांचा आणि सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार श्री. सचिन मस्के यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यात्रा उत्सवासाठी म्हसवड नगरी सज्ज सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून, यात्रा निर्विघ्नपणे पार पाडाव -ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे

श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यात्रा उत्सवासाठी म्हसवड नगरी सज्ज सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून, यात्रा निर्विघ्नपणे पार पाडाव -ग्रामविकास व

Live Cricket