पाइप गॅस जोडण्यांना गती; परवाने व शुल्क सवलतींना ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ भारतीय शिक्षण व्यवस्थेचा प्राचीन वारसा जपणे गरजेचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपली फलटण मॅरेथॉनचे रविवारी आयोजन आपली फलटण मॅरेथॉन २०२६ चा उत्साह शिगेला; २५०० स्पर्धकांचा सहभाग माजी सैनिक तसेच पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय आणि राज्य वन विभागातील माजी महिला कर्मचारी यांची 136 पायदळ बटालियन (प्रादेशिक सेना) पर्यावरण भरती राज्यातील पशुधनासाठी चारा उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी “मिशन मुरघास” मोहीम-पशुसंवर्धन आयुक्तालय, पुणे मनसेच्या आक्रमक पाठपुराव्याला यश; साताऱ्यात FDA ची मोठी कारवाई, १.८७ लाखांचा माल जप्त, ३ परवाने निलंबित
Home » राज्य » प्रशासकीय » मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा; वाईत कडक बंद आणि भव्य मोर्चा

मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा; वाईत कडक बंद आणि भव्य मोर्चा

मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा; वाईत कडक बंद आणि भव्य मोर्चा

वाई (संजीव वरे ) –मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी वाई तालुक्यात आज सकल मराठा समाजाच्या वतीने कडक बंद पाळण्यात आला, तसेच प्रशासनाला निवेदनही सादर करण्यात आले.

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जरांगे पाटील अंतरवाली सराटी येथे गेले अकरा दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना पाठिंबा मिळत असून, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वाई तालुक्यातही आंदोलनाची हाक देण्यात आली. या पार्श्वभूमीवर वाई शहरात व तालुक्यात उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला, ज्यास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

सकल मराठा समाजाचे बांधव आज वाईतील गणपती घाटावर एकत्र आले. तेथून भव्य मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा वाई नगरपरिषद कार्यालय, दातार हॉस्पिटल, सरकारी दवाखान्यासमोरून किसनवीर चौकमार्गे उपविभागीय कार्यालयावर धडकला. या वेळी उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या सरकारने तात्काळ मंजूर कराव्यात, तसेच त्यांच्या तब्येतीची योग्य काळजी घ्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीस काही धोका निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला.मोर्चा व बंदला सर्व स्तरातून उस्फुर्त पाठिंबा मिळाला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

पाइप गॅस जोडण्यांना गती; परवाने व शुल्क सवलतींना ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ

पाइप गॅस जोडण्यांना गती; परवाने व शुल्क सवलतींना ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदतवाढ मुंबई, दि. २४: राज्यात घरगुती पाइप गॅस

Live Cricket