Home » ठळक बातम्या » बाल गणेश मंडळाच्या आरतीस नगराध्यक्ष दिलीप बगाडे यांची उपस्थिती

बाल गणेश मंडळाच्या आरतीस नगराध्यक्ष दिलीप बगाडे यांची उपस्थिती

बाल गणेश मंडळाच्या आरतीस नगराध्यक्ष दिलीप बगाडे यांची उपस्थिती

पाचगणी : येथील बाल गणेश मंडळाच्या गणरायाच्या आरतीस पाचगणी नगरीचे नगराध्यक्ष श्री. दिलीपभाऊ बगाडे तसेच नगरसेवक श्री. प्रवीण बोधे यांनी उपस्थित राहून श्री गणरायाची आरती केली. यावेळी त्यांनी मंडळास भेट देत मंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती घेतली.

बाल गणेश मंडळाची स्थापना १९८१ मध्ये झाली असून, स्थापनेपासून आजपर्यंत मंडळाच्या वतीने विविध सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत मंडळाने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र भंडारी यांनी आरतीस उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमास मंडळाचे कार्यकर्ते मंगेश यादव, अनिल माने, संदीप माने, प्रमोद माने, अविनाश माने, जितेंद्र भंडारी, सुयोग बेलोशे, किरण रांजणे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. दिनेश धुमाळ यांची बिनविरोध निवड

वाई बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. दिनेश धुमाळ यांची बिनविरोध निवड वाई : अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, वाई येथील वकील

Live Cricket