श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यात्रा उत्सवासाठी म्हसवड नगरी सज्ज सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून, यात्रा निर्विघ्नपणे पार पाडाव -ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे डॉ. नितीन देशपांडे यांना स्विस इंटरनॅशनल मॅनेजमेंट अकॅडमीकडून ‘डॉक्टरेट ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन’ पदवी प्रदान जागतिक वारसा सप्ताह आणि साताऱ्यातील वारसा आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेतून महाराष्ट्राच्या खेळाडूंना जागतिक संधी- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार पुण्यात इंडिया इंटरनॅशनल ओपन तायक्वांदो चॅम्पियनशिपचे उद्घाटन साधना इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 79 वा NCC दिवस उत्साहात साजरा कराडच्या संतोष पाटील आणि श्रीकांत वारे दिग्दर्शित “आरंभकडा” लघुपटाची शिवप्रहार राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत अधिकृत निवड; ९६ दर्जेदार लघुपटांमध्ये कराडच्या भूमिपुत्रांची बाजी
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » प्रवीण पाटील यांच्या दाव्यांना उद्योजक युसुफ कच्छी यांचे प्रत्युत्तर; आरक्षण, बांधकाम आणि व्यवहाराच्या चौकशीची मागणी

प्रवीण पाटील यांच्या दाव्यांना उद्योजक युसुफ कच्छी यांचे प्रत्युत्तर; आरक्षण, बांधकाम आणि व्यवहाराच्या चौकशीची मागणी 

प्रवीण पाटील यांच्या दाव्यांना उद्योजक युसुफ कच्छी यांचे प्रत्युत्तर; आरक्षण, बांधकाम आणि व्यवहाराच्या चौकशीची मागणी 

सर्व्हे नं. २७३ प्रकरणाची महसूल व संबंधित यंत्रणांकडून चौकशी करण्याची मागणी

सातारा : प्रवीण पाटील यांनी अलीकडे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांवर युसुफ कच्छी यांनी पत्रकार परिषद घेऊन पुराव्यांसह प्रत्युत्तर देण्याचा दावा केला. पाटील यांनी केलेली विधाने दिशाभूल करणारी असल्याचा आरोप करत केला.

प्रवीण पाटील यांनी आपणास ब्लॅकमेल व टॉर्चर केले जात असल्याचा आरोप केला असल्याचे सांगत कच्छी म्हणाले की, हे आरोप निराधार आहेत. आपण गेल्या ३५ वर्षांपासून सातारा येथे बांधकाम व्यवसायात कार्यरत असून कायदेशीर पद्धतीने व्यवसाय करत असल्याचे सांगितले संबंधित जागेबाबत तक्रारदारांनी न्यायालयात दाद मागितली असून, पाटील यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल असल्याची एन.सी.ची प्रत उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

खरेदी व्यवहारावर प्रश्नचिन्ह उपस्थित

सर्व्हे नं. २७३, बुधवार पेठ येथील जागेबाबत १३ वर्षांपूर्वी सुमारे ७० लाख रुपयांचा करार झाल्याचा दावा कच्छी यांनी केला. सध्याच्या बाजारमूल्याच्या तुलनेत ही जागा सुमारे ९० लाख रुपयांत खरेदी केल्याचे दाखविले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

या व्यवहारातील कागदपत्रे, बाजारमूल्य, मुद्रांक शुल्क तसेच व्यवहारातील आर्थिक बाबींची महसूल विभागासह संबंधित सक्षम यंत्रणांनी चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच व्यवहारात काही अनियमितता आढळल्यास त्याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली.

जागेवर आरक्षण असल्याचा दावा

सदर जागेवर कोणतेही आरक्षण नसल्याचा पाटील यांचा दावा असल्याचे सांगत कच्छी यांनी सातारा नगरपरिषदेच्या विकास आराखड्याचा दाखला सादर करण्याची तयारी दर्शवली. त्यांच्या म्हणण्यानुसार, सर्व्हे नं. २७३ संदर्भात ‘आरक्षण क्र. ९४’ तसेच सुधारित आरक्षण ‘VII/5 – Children Play Ground’ असल्याचे संबंधित आराखड्यात नमूद आहे.

दरम्यान, पाटील यांच्या जागेवर केवळ कंपाउंड वॉचमन शेडचे काम सुरू असल्याचा दावा करण्यात आला असताना प्रत्यक्षात मोठ्या आकाराचे आर.सी.सी. कॉलम उभारण्यात आल्याचा आरोप कच्छी यांनी केला. या बांधकामासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत का, याची नगरपालिकेने तपासणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

नगरपालिकेकडे तक्रारी दाखल

सदर बांधकामाबाबत सातारा नगरपालिकेकडे लेखी तक्रारी करण्यात आल्याचे कच्छी यांनी सांगितले. संबंधित तक्रारींवर प्रशासनाने काय कारवाई केली, तसेच बांधकामाला परवानगी आहे का, याबाबत स्पष्टता देण्याची मागणी त्यांनी केली.पालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारींकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोपही पत्रकार परिषदेत करण्यात आला. मात्र, या आरोपांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची बाजू उपलब्ध झालेली नाही.सर्व आरोपांची संबंधित शासकीय यंत्रणांनी कागदपत्रांच्या आधारे स्वतंत्रपणे पडताळणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यात्रा उत्सवासाठी म्हसवड नगरी सज्ज सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून, यात्रा निर्विघ्नपणे पार पाडाव -ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे

श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यात्रा उत्सवासाठी म्हसवड नगरी सज्ज सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून, यात्रा निर्विघ्नपणे पार पाडाव -ग्रामविकास व

Live Cricket