अफझल खान कबर परिसरात 163 कलम लागू राज्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार; परतीच्या प्रवासासाठी पोषक वातावरण अभियांत्रिकी शिक्षणाला नव्या युगाची दिशा देणारा यशोदा टेक्निकल कॅम्पस : अभियंता दिनाच्या निमित्ताने नवोन्मेष, उद्योगाभिमुखता आणि उद्याच्या तंत्रज्ञानाची वाटचाल भारतीय भाषांच्या सन्मानातूनच ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ची संकल्पना साकार होईल – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन पाटखळमध्ये बीम लाईट व डॉल्बीचा वापर; डबेवाडीत विनापरवाना डॉल्बी वाद्यासह मिरवणूक — दोन स्वतंत्र गुन्हे दाखल
Home » राज्य » प्रशासकीय » पाटखळमध्ये बीम लाईट व डॉल्बीचा वापर; डबेवाडीत विनापरवाना डॉल्बी वाद्यासह मिरवणूक — दोन स्वतंत्र गुन्हे दाखल

पाटखळमध्ये बीम लाईट व डॉल्बीचा वापर; डबेवाडीत विनापरवाना डॉल्बी वाद्यासह मिरवणूक — दोन स्वतंत्र गुन्हे दाखल

डॉल्बी-लेझर’वर कारवाईचा लगाम; सातारा तालुका पोलिसांची गणेश मंडळांवर पहिली कारवाई

पाटखळमध्ये बीम लाईट व डॉल्बीचा वापर; डबेवाडीत विनापरवाना डॉल्बी वाद्यासह मिरवणूक — दोन स्वतंत्र गुन्हे दाखल

सातारा : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळांवर सातारा तालुका पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पाटखळ येथे गणपती आगमन मिरवणुकीत बीम लाईट व डॉल्बीचा वापर केल्याप्रकरणी, तर डबेवाडी येथे कोणतीही परवानगी न घेता डॉल्बी वाद्य व साऊंडसह गणेशमूर्ती आगमन मिरवणूक काढल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी मंडळांच्या कार्यकर्त्यांना नियमांचे पालन करण्याचे केलेले आवाहन आणि उल्लंघन झाल्यास कारवाईचा दिलेला इशारा यानंतर तालुका पोलिस ठाण्यात प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि १३ रोजी रात्री सुमारे ८ते साडे दहा वाजण्याच्या दरम्यान पाटखळ (ता. सातारा) येथे श्री संत गाडगे महाराज मित्र गणेशोत्सव मंडळाच्या गणपती आगमन मिरवणुकीत बीम लाईट आणि डॉल्बी सिस्टीमचा वापर करण्यात आला. त्याची शहानिशा करून कॉ . संदीप फणसे यांनी दिलेल्या फि यार्यादीनुसार मंडळाचे अध्यक्ष रुपेश रविंद्र सोनटक्के यांच्यासह सिद्धांत प्रकाश सोनटक्के, रजत अनिल सोनटक्के, हणमंत मधुकर सोनटक्के, नवनाथ श्रीरंग सोनटक्के, गणेश रघुनाथ सोनटक्के आणि प्रणय लहु सोनटक्के यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. लेझर बीम लाईटचा वापर केल्याप्रकरणी त्याचा मालक अभिजीत संतोष पवार (रा. चिंचणी ता . सातारा) तसेच डॉल्बी मालक रजनीकांत नागे (पूर्ण नाव उपलब्ध नाही, रा.पोलिस मुख्यालयाशेजारी सातारा) यांचाही गुन्ह्यात समावेश आहे. अधिक तपास हवालदार प्रविण वायदंडे करत आहेत . 

पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या ३ सप्टेंबर रोजीच्या आदेशानुसार लेझर वापराबाबत निर्बंध लागू असतानाही तसेच सातारा तालुका पोलिस ठाण्याकडून ६ सप्टेंबर रोजी कलम १६८ ची नोटीस बजावण्यात आलेली असतानाही संबंधितांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

दरम्यान, डबेवाडी (ता. सातारा)येथेही दि . १३ रोजीच रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास गणेशमूर्ती आगमनाची मिरवणूक कोणतीही परवानगी न घेता डीजे साऊंडसह काढण्यात आली. याप्रकरणी हवालदार प्रदीप मोहिते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंडळाचे अध्यक्ष मयुर माने यांच्यासह आकाश चव्हाण, सुमित माने, विशाल माने, प्रज्वल माने आणि अनिकेत माने (सर्व रा. डबेवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणातही ६ सप्टेंबरच्या नोटिशीचे उल्लंघन केल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक फौजदार चंद्रकांत माने करत आहेत . 

पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी गणेश मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नियमांचे पालन करून उत्सव शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यानंतरही नियमांचे उल्लंघन झाल्याने सातारा तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरिक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई सुरू केली आहे. आगामी मिरवणुकांमध्येही नियमभंग करणाऱ्या मंडळांवर कारवाईचा इशारा सातारा तालुका पोलिसांनी दिला आहे.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

Live Cricket