श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यात्रा उत्सवासाठी म्हसवड नगरी सज्ज सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून, यात्रा निर्विघ्नपणे पार पाडाव -ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे डॉ. नितीन देशपांडे यांना स्विस इंटरनॅशनल मॅनेजमेंट अकॅडमीकडून ‘डॉक्टरेट ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन’ पदवी प्रदान जागतिक वारसा सप्ताह आणि साताऱ्यातील वारसा आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेतून महाराष्ट्राच्या खेळाडूंना जागतिक संधी- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार पुण्यात इंडिया इंटरनॅशनल ओपन तायक्वांदो चॅम्पियनशिपचे उद्घाटन साधना इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 79 वा NCC दिवस उत्साहात साजरा कराडच्या संतोष पाटील आणि श्रीकांत वारे दिग्दर्शित “आरंभकडा” लघुपटाची शिवप्रहार राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत अधिकृत निवड; ९६ दर्जेदार लघुपटांमध्ये कराडच्या भूमिपुत्रांची बाजी
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » पर्यटन क्षेत्रातील कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर आवश्यक – आनंद महुरकर

पर्यटन क्षेत्रातील कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर आवश्यक – आनंद महुरकर

पर्यटन क्षेत्रातील कामकाजात कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर आवश्यक – आनंद महुरकर

जागतिक पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा उपक्रम

मुंबई : पर्यटन क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व वाढत असून पर्यटन सेवा, संवाद, सेवा पुरवठा आणि दैनंदिन व्यावसायिक कामकाजात तिचा प्रभावी वापर करता येऊ शकतो, असे मार्गदर्शन ‘फाइंडॅबिलिटी सायन्सेस’, अमेरिकेचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद महुरकर यांनी केले.

जागतिक पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि राज्य शासनाच्या पर्यटन विभागाने ‘नवोदितांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावर विशेष वेबिनार आयोजित केला होता. यंदाच्या जागतिक पर्यटन दिनाची ‘डिजिटल अजेंडा अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स टू रिडिझाइन टुरिझम’ ही संकल्पना लक्षात घेऊन या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश र. गटणे ऑनलाइन उपस्थित होते.

श्री. महुरकर यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मूलभूत संकल्पनांची माहिती देत पर्यटन क्षेत्रातील तिचे वाढते महत्त्व आणि संभाव्य उपयोग स्पष्ट केले. नाथ स्कूल ऑफ बिझनेस अँड टेक्नॉलॉजीचे संचालक हर्षवर्धन जाजू यांनी उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि बदलत्या अंकीय विश्वाविषयी विचार मांडले.

पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या नेतृत्वाखाली, तसेच पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश र. गटणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

 

महामंडळाचे मुख्यालय, प्रादेशिक कार्यालये, पर्यटक निवासस्थाने, नौकाविहार केंद्रे, उपाहारगृहे, अभ्यागत केंद्रे, कलाग्राम आणि अभियांत्रिकी विभागातील अधिकारी व कर्मचारी या परिसंवादात सहभागी झाले. पर्यटन क्षेत्रातील संबंधित घटक आणि पर्यटन संघटनांच्या प्रतिनिधींनाही सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल आणि व्यवसाय विकास विभागाच्या प्रमुख मानसी कोठारे यांनी परिसंवादाच्या आयोजन व अंमलबजावणीची जबाबदारी सांभाळली. संजय देखणे यांनी आभार मानले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यात्रा उत्सवासाठी म्हसवड नगरी सज्ज सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून, यात्रा निर्विघ्नपणे पार पाडाव -ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे

श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यात्रा उत्सवासाठी म्हसवड नगरी सज्ज सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून, यात्रा निर्विघ्नपणे पार पाडाव -ग्रामविकास व

Live Cricket