श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यात्रा उत्सवासाठी म्हसवड नगरी सज्ज सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून, यात्रा निर्विघ्नपणे पार पाडाव -ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे डॉ. नितीन देशपांडे यांना स्विस इंटरनॅशनल मॅनेजमेंट अकॅडमीकडून ‘डॉक्टरेट ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन’ पदवी प्रदान जागतिक वारसा सप्ताह आणि साताऱ्यातील वारसा आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेतून महाराष्ट्राच्या खेळाडूंना जागतिक संधी- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार पुण्यात इंडिया इंटरनॅशनल ओपन तायक्वांदो चॅम्पियनशिपचे उद्घाटन साधना इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 79 वा NCC दिवस उत्साहात साजरा कराडच्या संतोष पाटील आणि श्रीकांत वारे दिग्दर्शित “आरंभकडा” लघुपटाची शिवप्रहार राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत अधिकृत निवड; ९६ दर्जेदार लघुपटांमध्ये कराडच्या भूमिपुत्रांची बाजी
Home » ठळक बातम्या » पत्रकारितेत सत्य, जबाबदारी आणि विश्वासाला सर्वोच्च स्थान द्या : नगराध्यक्ष अनिल सावंत वाई नगरीत प्रगती टाइम्स वृत्तपत्राचा वर्धापन दिन उत्साहात पार

पत्रकारितेत सत्य, जबाबदारी आणि विश्वासाला सर्वोच्च स्थान द्या : नगराध्यक्ष अनिल सावंत  वाई नगरीत प्रगती टाइम्स वृत्तपत्राचा वर्धापन दिन उत्साहात पार 

पत्रकारितेत सत्य, जबाबदारी आणि विश्वासाला सर्वोच्च स्थान द्या : नगराध्यक्ष अनिल सावंत 

वाई नगरीत प्रगती टाइम्स वृत्तपत्राचा वर्धापन दिन उत्साहात पार 

वाई: स्थानिक प्रश्नांना वाचा फोडत समाजाच्या विविध घटकांचा आवाज बनलेल्या ‘प्रगती टाइम्स’ वृत्तपत्राचा वर्धापन दिन सोहळा उत्साहपूर्ण आणि दिमाखदार वातावरणात मान्यवरांच्या उपस्थितीत वाई येथील सत्यवती जोशी सभागृह, कन्याशाळा, वाई येथे पार पडला. पत्रकारितेचे सामाजिक उत्तरदायित्व, विश्वासार्हता आणि बातमी मांडताना घ्यावयाची काळजी यावर यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्ष अनिल सावंत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य दिनकर (बापूसाहेब) शिंदे, तर प्रमुख उपस्थिती म्हणून अमर कोल्हापुरे (संचालक, उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, वाई), विजय ढेकाने (नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते, वाई नगरपरिषद) आणि सचिन ननावरे (अध्यक्ष, वाई तालुका मराठी पत्रकार संघ) उपस्थित होते.

     कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. अध्यक्ष अनिल सावंत यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य दिनकर (बापू )शिंदे तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

     यावेळी उपस्थित मान्यवरांचे ‘प्रगती टाइम्स’च्या वतीने शॉल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि तुळशीचे रोप देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. पत्रकार बांधवांचाही तुळशीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले.

     महिला लोकप्रतिनिधींचा विशेष सन्मान ‘प्रगती टाइम्स’च्या कराड प्रतिनिधी विजया माने यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेविका केतकी पाटणे, जागृती पोरे, पद्मा पाडळे आणि अपर्णा जमदाडे यांचा सन्मान करण्यात आला

     यावेळी मनोगत व्यक्त करताना जिल्हा परिषद सदस्य दिनकर (बापूसाहेब) शिंदे यांनी ‘प्रगती टाइम्स’च्या पत्रकारितेच्या वाटचालीचे कौतुक केले. स्थानिक पातळीवरील प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्याबरोबरच सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या प्रशासन आणि लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम ‘प्रगती टाइम्स’ करत असल्याचे त्यांनी नमूद केले. वृत्तपत्राने यापुढेही समाजातील सकारात्मक घडामोडी, विकासकामे तसेच नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत आपली विश्वासार्हता अधिक दृढ करावी, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

     अध्यक्षीय भाषणात नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी पत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपावर भाष्य करताना बातमी करताना कोणत्या बाबी टाळल्या पाहिजेत, याचे सखोल विश्लेषण केले. पत्रकारितेत वस्तुनिष्ठता, सत्यता आणि सामाजिक जबाबदारी जपणे आवश्यक असून, कोणत्याही बातमीमागील तथ्य पडताळून पाहणे ही पत्रकाराची महत्त्वाची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याची प्रक्रिया नसून समाजाला दिशा देण्याचे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे बातमी मांडताना शब्दांची जबाबदारी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या परिणामांची जाणीव पत्रकारांनी ठेवली पाहिजे,’ असा संदेश त्यांनी दिला.

     कार्यक्रमास नगरसेवक प्रसाद बनकर, सुशील खरात, माजी नगरसेवक प्रदीप चोरगे, वाई तालुका मराठी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी, डिजिटल मीडिया परिषदेचे पदाधिकारी तसेच शहरातील विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक येवले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डिजिटल मीडियाच्या सारिका गवते, शुभम कोदे, प्रविण नवघरे आणि प्रशांत थोरवे यांनी मोलाचे सहकार्य केले.

     

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यात्रा उत्सवासाठी म्हसवड नगरी सज्ज सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून, यात्रा निर्विघ्नपणे पार पाडाव -ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे

श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यात्रा उत्सवासाठी म्हसवड नगरी सज्ज सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून, यात्रा निर्विघ्नपणे पार पाडाव -ग्रामविकास व

Live Cricket