श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यात्रा उत्सवासाठी म्हसवड नगरी सज्ज सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून, यात्रा निर्विघ्नपणे पार पाडाव -ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे डॉ. नितीन देशपांडे यांना स्विस इंटरनॅशनल मॅनेजमेंट अकॅडमीकडून ‘डॉक्टरेट ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन’ पदवी प्रदान जागतिक वारसा सप्ताह आणि साताऱ्यातील वारसा आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेतून महाराष्ट्राच्या खेळाडूंना जागतिक संधी- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार पुण्यात इंडिया इंटरनॅशनल ओपन तायक्वांदो चॅम्पियनशिपचे उद्घाटन साधना इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 79 वा NCC दिवस उत्साहात साजरा कराडच्या संतोष पाटील आणि श्रीकांत वारे दिग्दर्शित “आरंभकडा” लघुपटाची शिवप्रहार राष्ट्रीय लघुपट स्पर्धेत अधिकृत निवड; ९६ दर्जेदार लघुपटांमध्ये कराडच्या भूमिपुत्रांची बाजी
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय?

देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 

देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा संप मागे, रात्री उशीरा कर्मचारी संघटनांची बैठक, नेमका काय झाला निर्णय? 

देशभरातील बँकांचे कर्मचारी  28 सप्टेंबरपासून संपावर जाणार होते. मात्र, हा तीन दिवसांचा संप स्थगित करण्यात आला आहे.बँकांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. देशभरातील बँकांचे कर्मचारी 28 सप्टेंबरपासून संपावर जाणार होते. मात्र, हा तीन दिवसांचा संप स्थगित करण्यात आला आहे. संपाच्या केवळ एक दिवस आधी, आयबीए (IBA) आणि बँक कामगार संघटनांची संघटना, यूएफबीयू (UFBU), यांनी काल रात्री उशिरा एक बैठक घेतली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली आणि काही निर्णय घेण्यात आले आहेत. संप स्थगित करण्यात आला आहे

प्रमुख मागणी म्हणजे पाच दिवसांचा कामाचा आठवडा

संपावर जाणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी म्हणजे पाच दिवसांचा कामाचा आठवडा ही आहे. यूनियनच्या नेत्यांच्या माहितीनुसार मुख्य श्रम आयुक्तांसोबत झालेल्या चर्चेत सरकारकडून पाच दिवसांचा कामाचा आठवडा लागू करण्यावर ठोस आश्वासन दिलं नाही. एआयबीओसीचे महासचिव रुपम रॉय यांनी सरकार आणि व्यवस्थापनाच्या आडमुठ्या धोरणामुळं यूनियनला आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्यास भाग पडलं, असं म्हटलं. काही सरकारी आणि वित्तीय संस्थांमध्ये पाच दिवसांच्या कामाच्या आठवड्याची पद्धत लागू आहे. एनसीबीईचे महासचिव एल चंद्रशेखर यांनी देखील केंद्र आणि राज्य सरकारची कार्यालये, आरबीआय, एलआयसी, जीआयसी, नाबार्ड या सारख्या इतर संस्थांमध्ये पाच दिवसांचा आठवडा सुरु आहे. शेअर बाजार, चलन बाजार आणि विदेशी चलन बाजारात देखील आठवड्यात पाच दिवस काम चालतं, असं म्हटलं.पेन्शनच्या लाभातील सुधारणा, सर्व पेन्शनधारकांना एक समान महागाई भत्ता धोरण, एनपीएसमधील कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेत परतण्याचा पर्याय उपलब्ध करुन द्याव्यात या देखील बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत. वित्त मंत्रालयानं बँक कर्मचाऱ्यांनी संपाचा मार्ग स्वीकारु नये असं म्हटलं आहे. चर्चेतून प्रश्न सोडवण्याचं आवाहन केलं आहे. पीएलआय योजना दीर्घ चर्चेनंतर या महिन्याच्या सुरुवातीलाच मागं घेतली गेली असल्याचं देखील वित्त मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.  

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यात्रा उत्सवासाठी म्हसवड नगरी सज्ज सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून, यात्रा निर्विघ्नपणे पार पाडाव -ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे

श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यात्रा उत्सवासाठी म्हसवड नगरी सज्ज सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून, यात्रा निर्विघ्नपणे पार पाडाव -ग्रामविकास व

Live Cricket