Home » राज्य » शिक्षण » तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत १४ वर्षे वयोगटात हिलरेंज माध्यमिक विद्यालयाचा संघ विजेता

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत १४ वर्षे वयोगटात हिलरेंज माध्यमिक विद्यालयाचा संघ विजेता

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत १४ वर्षे वयोगटात हिलरेंज माध्यमिक विद्यालयाचा संघ विजेता

पांचगणी प्रतिनिधी : सातारा जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत १४ वर्षे वयोगटातील हिलरेंज माध्यमिक विद्यालय, भिलारच्या मुलींच्या संघाने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले. तर गार्गी जाधव हिला उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.पाचगणी येथील महात्मा फुले हायस्कुलच्या क्रीडांगणावर दिं.२१ रोजी झालेल्या तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेदरम्यान हिलरेंजच्या खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक खेळ, आत्मविश्वास, शिस्त आणि जिद्द यांचे दर्शन घडवत प्रतिस्पर्धी ज्ञानगंगा हायस्कूलच्या संघांवर मात करीत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.

 प्राचार्य दिगंबर मिरजापुरे,भगवानसिंग राजपूत, राहुल कांबळे, राज्यपंच आकाश माने यांच्या हस्ते विजेता संघास गौरविण्यात आले.हिलरेंजच्या खेळाडूंना व्यवस्थापक विनायक बगाडे, संगीता खरात आणि सुजाता पारठे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. 

हिलरेंज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीन भिलारे, सचिव जतीन भिलारे, संचालिका डॉ. तेजस्विनी भिलारे तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकुंद शिंदे, नंदकुमार शिंदे,शांताराम जाधव, कल्पेश गायकवाड, राजू मोरे,संतोष मालुसरे, योगिता रांजणे, एस बी भगत आदी शिक्षकांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत १४ वर्षे वयोगटात हिलरेंज माध्यमिक विद्यालयाचा संघ विजेता

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत १४ वर्षे वयोगटात हिलरेंज माध्यमिक विद्यालयाचा संघ विजेता पांचगणी प्रतिनिधी : सातारा जिल्हा क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित

Live Cricket