ड्रोन, गुगलवर अवलंबून न राहता बांधावर जाऊन पंचनामे करा; नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये – पालकमंत्री शंभूराजे देसाई
फलटण प्रतिनिधी -दुष्काळी भागात काम करणाऱ्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन स्थळ पाहणीचे पंचनामे करावेत त्याचप्रमाणे नुकसान झालेला एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आदेश पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिले.
वाठार निंबाळकर तालुका फलटण येथील शेतकरी विश्वनाथ टाळकुटे व स्वप्नील काळुखे यांच्या बाजरी पिकाच्या शेतावर प्रत्यक्ष जाऊन दुष्काळी पाहणी करताना पालकमंत्री शंभूराजे देसाई बोलत होते, माजी आमदार दीपकराव चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य सह्याद्री कदम, उपसभापती अमोल सस्ते, जिल्हा परिषद सदस्य गिरीश बनकर, जिल्हा परिषद सदस्या वैशालीताई कांबळे, ज्योतीताई मोरे, रूपालीताई सरगर, विराज खराडे,उपविभागीय कृषी अधिकारी खलील मोमीन,तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड, पोलीस निरीक्षक प्रशांत सुबनवळ,मंडलअधिकारी बापूराव गाडे, तलाठी संतोष पुंडेकर, ग्रामपंचायत अधिकारी पी बी नाळे, माजी सरपंच अशोकराव निंबाळकर, यांच्या सह पंचायत समिती सदस्य, व शासनाच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या सूचनेनुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयानुसार प्रत्येक मंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात प्रत्यक्षात बांधावर जाऊन दुष्काळाची पाहणी करावी व त्याबाबतच्या उपाययोजना याबाबतचा अहवाल मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा, त्याप्रमाणे मी दुष्काळी पाहणी करीत असून सरकार निसर्गाच्या अवकृपेमुळे निर्माण झालेल्या संकटात शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहील, शेतकऱ्याला या अडचणीतून बाहेर काढू असे आश्वासन पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले.
एकच पिकाच्या घेवडा व राजमा या दोन नावांमुळे शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याने याबाबत जिल्ह्याच्या वतीने शासनाकडे प्रस्ताव पाठवून केंद्रामधून त्याही शेतकऱ्यांना मदत कशी मिळेल याबाबत प्रयत्न केले जातील, तसेच जनावरांसाठीच्या चारा व पाणी याबाबत ही जिल्ह्याच्या वतीने विस्तृतपणे अहवाल सादर करून त्याबाबत ही शेतकऱ्यांना सरकारच्या वतीने नक्की मदत करण्यात येईल, थोडीफार शिल्लक असलेली पिके जगण्यासाठी वीज वितरण विभागाची तातडीने बैठक घेऊन वीज वारंवार खंडित होणार नाही याबाबतच्या सूचना संबंधितांना दिल्या जातील, फलटण तालुक्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडत असून पाऊस पडला तरी पण मी सुरूच राहतील, तसेच गरज पडल्यास मागेल त्या गावात जनावरांना व नागरिकांना पिण्यासाठी पाणी टँकर जास्तीचे उपलब्ध करून दिले जातील, केवळ गुगल वर नेटवर, ड्रोन द्वारे ,मोबाईलवर अवलंबून न राहता प्रत्यक्षात बांधावर जाऊन स्थळ पाणी केली जावी याबाबत आपण स्वतः मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री यांच्यासमोर मुद्दा उपस्थित करून कृषी विभागाने प्रत्यक्षात स्थळ पाहणी करून पंचनामे करावेत यासाठी आग्रही मागणी केली होती, त्यामध्ये झालेल्या सूचनेनुसार राज्यात सर्वत्रच ड्रोन व इतर आधुनिक सुविधांनी पंचनामे न करता प्रत्यक्षात कृषी विभागाने बांधावर जाऊन वस्तुनिष्ठ पंचनामे करण्याचे आदेश जिल्ह्यातील कृषी विभागाला दिलेले असून जिल्हाधिकारी यांच्याकडे तात्काळ पंचनामे सबंधितांनी जमा करावेत, असे आदेश कृषी विभागाला दिलेले आहेत अशी माहिती पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली, यावेळी वाठार निंबाळकर तसेच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





