Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » जागतिक साक्षरता दिनानिमित्त साक्षरता जनजागृती रॅलीचे आयोजन

जागतिक साक्षरता दिनानिमित्त साक्षरता जनजागृती रॅलीचे आयोजन

जागतिक साक्षरता दिनानिमित्त साक्षरता जनजागृती रॅलीचे आयोजन

सातारा : यशोदा शिक्षण संस्था संचलित, साधना माध्यमिक विद्यालय, सातारा येथे ८ सप्टेंबर जागतिक साक्षरता दिनानिमित्त स्काऊट-गाईड विद्यार्थ्यांच्या सहभागातून साक्षरता जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.

साक्षरतेचे महत्त्व, शिक्षणाची गरज आणि समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शिक्षण पोहोचविण्याचा संदेश देण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध जनजागृतीपर घोषणा देत रॅलीत उत्स्फूर्त सहभाग घेतला. “शिक्षण हा प्रत्येकाचा हक्क आहे”, “साक्षर व्हा, प्रगत व्हा”अशा घोषणांद्वारे नागरिकांमध्ये साक्षरतेविषयी जनजागृती करण्यात आली.

ही रॅली साधना माध्यमिक विद्यालय → बॉम्बे रेस्टॉरंट चौक → वनवासवाडी → देशमुख नगर या मार्गाने काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने रॅलीत सहभाग घेत समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.तसेच इयत्ता 10 वीच्या गाईड विद्यार्थिनींनी साक्षरता दिनाविषयी पथनाट्य सादर केले.या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, जनजागृती आणि समाजसेवेची भावना निर्माण होण्यास मदत झाली. विद्यालयातील शिक्षक, स्काऊट-गाईड पथक तसेच विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हा उपक्रम उत्साहात पार पडला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाईत विकास अण्णा शिंदे मित्र परिवाराची भव्य दहीहंडी उत्साहात

वाईत विकास अण्णा शिंदे मित्र परिवाराची भव्य दहीहंडी उत्साहात वाई: सातारा जिल्हा परिषद सदस्य बापूसाहेब शिंदे यांच्या वतीने युवा नेते

Live Cricket