शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; शासन खंबीरपणे पाठिशी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह्याद्रीच्या समृद्ध वनांवर कुऱ्हाड भीमाशंकर व कर्जत परिसरातील वृक्षतोडीविरोधात ‘टायगर ग्रुप’ आक्रमक आंदोलनाचा इशारा धन्वंतरी पतसंस्थेमध्ये धन्वंतरी जयंतीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी केले ‘मीडिया सेवन’च्या दिवाळी अंकाचे स्वागत! संपादिका मुस्कान तांबोळी यांनी दिवाळी अंक भेट देत उपक्रमाची दिली माहिती हृदयविकार रुग्णांसाठी १२ रोजी सातारा, वाई येथे मोफत मार्गदर्शन शिबिर सकाळच्या नास्त्यात तर्री पोहा; शेतकरी कुटुंबात मुख्यमंत्र्यांची भाऊबीज पुढल्या वर्षी वहिनींना घेऊन या; अरूणाताईंचा मुख्यमंत्र्यांना आग्रह
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » गणेशोत्सवाचा वारसा डिजिटल माध्यमातून जगभर पोहोचावा जिल्ह्यातील गणेश मंडळे व नागरिकांनी Bappa.org वर छायाचित्रे, व्हिडिओ अपलोड करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

गणेशोत्सवाचा वारसा डिजिटल माध्यमातून जगभर पोहोचावा जिल्ह्यातील गणेश मंडळे व नागरिकांनी Bappa.org वर छायाचित्रे, व्हिडिओ अपलोड करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

गणेशोत्सवाचा वारसा डिजिटल माध्यमातून जगभर पोहोचावा जिल्ह्यातील गणेश मंडळे व नागरिकांनी Bappa.org वर छायाचित्रे, व्हिडिओ अपलोड करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

सातारा- महाराष्ट्राची वैभवशाली सांस्कृतिक ओळख असलेला गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून घोषित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला जागतिक पातळीवर नेण्याबरोबरच त्याचा युनेस्कोच्या वारसा दर्जासाठी दावा करण्याच्या दृष्टीने राज्य शासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील गणेशोत्सवाची कला, संस्कृती, परंपरा आणि सामाजिक सहभाग डिजिटल माध्यमातून जतन करून जगभर पोहोचविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे. 

गणेशोत्सवाशी निगडित स्थानिक कला, सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक सहभाग यांचे डिजिटल माध्यमातून जतन करण्यासाठी Bappa.org हे डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. या माध्यमातून घरगुती गणपती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आपल्या गणेशोत्सवाची छायाचित्रे व व्हिडिओ अपलोड करता येणार आहेत.

या उपक्रमामुळे जिल्ह्यातील गणेशोत्सवातील वैशिष्ट्यपूर्ण परंपरा, लोककला आणि सांस्कृतिक वारसा पुढील पिढ्यांसाठी डिजिटल स्वरूपात जतन करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तसेच महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाची माहिती देश-विदेशातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.

या उपक्रमासाठी स्वतंत्र ॲप डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही. नागरिकांनी आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपतीचे चांगल्या दर्जाचे छायाचित्र तसेच गणेशोत्सवाची माहिती देणारा दोन ते चार ओळींचा मजकूर Bappa.org या मंचावर पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, गणेश मंडळे आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन Bappa.org या डिजिटल व्यासपीठावर छायाचित्रे व व्हिडिओ अपलोड करावेत. तसेच या उपक्रमाची जिल्ह्यात व्यापक प्रसिद्धी करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असेही निर्देश जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी दिली आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; शासन खंबीरपणे पाठिशी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; शासन खंबीरपणे पाठिशी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालना : राज्यात दुष्काळाचे संकट निर्माण झाले असले, तरी

Live Cricket