Home » राज्य » शेत शिवार » खंडाळा तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तातडीने संयुक्त पंचनामे व पीक पाहणी करण्याचे निर्देश

खंडाळा तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तातडीने संयुक्त पंचनामे व पीक पाहणी करण्याचे निर्देश

खंडाळा तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तातडीने संयुक्त पंचनामे व पीक पाहणी करण्याचे निर्देश

सातारा :- खंडाळा तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना शासनाच्या विविध सवलती व मदतीचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी आज तहसील कार्यालय, खंडाळा येथे प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला खंडाळा तालुक्याचे तहसीलदार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.  

शासन निर्णयानुसार खंडाळा तालुक्यातील पीक परिस्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक, सहाय्यक कृषी अधिकारी व कृषी सेवक यांच्या संयुक्त पथकांमार्फत २८ सप्टेंबर पासून संयुक्त पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. या कामावर मंडळ अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी यांच्यामार्फत देखरेख करण्यात करण्यात यावी. पंचनाम्याच्या वेळी प्रत्यक्ष शेतातील पिकाची स्थिती दर्शविणारी छायाचित्रे व आवश्यक पीकविषयक माहिती संकलित करण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांचे बँक खाते, आयएफसी कोड, सर्वे नंबर, आधार क्रमांक आदी आवश्यक माहिती अचूकपणे नोंदविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत प्रांताधिकारी डॉ. खरमाटे यांनी केल्या.

  खंडाळा तालुक्यातील परिस्थिती लक्षात घेऊन जमीन महसुलात सूट, पीक कर्जाच्या पुनर्गठनाबाबत उपाययोजना, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपांच्या वीजबिलासंदर्भातील सवलती, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात सवलत, रोजगार हमी योजनेंतर्गत कामांमध्ये आवश्यक शिथिलता तसेच पिण्याच्या पाण्याची उपलब्धता यांसारख्या विविध उपाययोजनांबाबत संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत.

तालुक्यातील सध्याची पीक परिस्थिती गंभीर असून, पावसातील अनियमितता, उशिरा झालेला पाऊस, पिकांची वाढ, रोग व किडींचा प्रादुर्भाव तसेच उत्पादनात घट यांचा परिणाम शेतीवर झाल्याचे बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आले. त्यामुळे पीक पंचनामे अचूक व वस्तुनिष्ठ पद्धतीने करण्यावर विशेष भर देण्यात यावा, अशाही सूचना डॉ. खरमाटे यांनी केल्या.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महाबळेश्वर पोलिसांचे पाऊल; आज २ ऑक्टोबरला हॉटेल व होम-स्टे चालकांची विशेष बैठक.

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महाबळेश्वर पोलिसांचे पाऊल; आज २ ऑक्टोबरला हॉटेल व होम-स्टे चालकांची विशेष बैठक. ​महाबळेश्वर –प्रसिद्ध पर्यटनस्थळ महाबळेश्वर येथे येणाऱ्या

Live Cricket