गणेशाच्या भक्तीत रंगले भरतनाट्यम्; ‘नृत्य विनायक’ला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अत्याधुनिक २०० व्होल्वो बसेस एसटीच्या ताफ्यात – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक विकसित भारतासाठी राज्यांची आर्थिक क्षमता बळकट करणे आवश्यक – वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल खंडाळा तालुका प्राथमिक शिक्षक समितीचा शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न एसटीच्या सवलती प्राप्त प्रवाशांसाठी एनसीएमसी कार्ड नोंदणी व वितरण प्रक्रियेत बदल नदीपात्राच्या स्वच्छतेसाठी वाई NCC युनिटचा स्तुत्य उपक्रम गणेशमूर्तींच संकलन करून नगरपालिकेकडे सुपूर्द; नदीतील सूक्ष्मजीवसृष्टीच्या संरक्षणासाठी विद्यार्थ्यांचा पर्यावरणपूरक पुढाकार
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » खंडाळा तालुका प्राथमिक शिक्षक समितीचा शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न

खंडाळा तालुका प्राथमिक शिक्षक समितीचा शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न

खंडाळा तालुका प्राथमिक शिक्षक समितीचा शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न

खंडाळा प्रतिनिधी -“त्याग आणि सेवा, न्यायाची चाड आणि अन्यायाची चीड”हे ब्रीदवाक्य घेऊन शिक्षकांच्या हक्कांसाठी, प्रश्नांसाठी आणि शैक्षणिक विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या खंडाळा तालुका प्राथमिक शिक्षक समितीचा शिक्षक मेळावा शनिवार दिनांक १९ सप्टेंबर २०२६ रोजी शिक्षक बँक सभागृह खंडाळा येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

शिक्षकांच्या विविध समस्या, शैक्षणिक क्षेत्रातील बदलती आव्हाने, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी आवश्यक उपक्रम तसेच शिक्षकांच्या सेवेशी निगडित विविध प्रश्नांवर मेळाव्यात सविस्तर चर्चा करण्यात आली. संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसाठी एकजुटीने व संघटितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

शिक्षक समिती ही केवळ हक्क आणि मागण्यांसाठी कार्य करणारी संघटना नसून शिक्षक, विद्यार्थी आणि समाजाच्या हितासाठी योगदान देणारी चळवळ म्हणून आपली भूमिका सातत्याने बजावत आहे. त्याग, सेवा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांच्या आधारावर शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्याबरोबरच गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करण्यावर समितीचा भर असल्याचे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य नेते उदयजी शिंदे यांनी यावेळी सांगितले.

मेळाव्यात उपस्थित शिक्षकांनी संघटनेची एकजूट अधिक मजबूत करण्याचा संकल्प केला. न्याय मिळवण्यासाठी संघर्ष आणि अन्यायाविरुद्ध आवाज”या भूमिकेसोबतच शिक्षकांच्या सन्मानासाठी आणि शैक्षणिक क्षेत्राच्या प्रगतीसाठी भविष्यातही संघटितपणे कार्य करण्याचा निर्धार करण्यात आला.

यावेळी उपस्थित महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य नेते उदय शिंदे,जिल्हा नेते विश्वंभर रणनवरे,जिल्हाध्यक्ष किरण यादव,सरचिटणीस संतोष घोडके,शिक्षक बँकेचे चेअरमन विशाल कणसे,जिल्हा सल्लागार धीरेश गोळे,महिला आघाडी प्रमुख सुलभा सस्ते,माजी चेअरमन विठ्ठल माने, पुष्पलता बोबडे,जिल्हा उपाध्यक्ष तातोबा भिसे, शशिकांत तोडकर,कार्याध्यक्ष शिवाजीराव शिंदे,कोषाध्यक्ष तानाजी वाघमोडे,माजी व्हाइस चेअरमन सुरेश पवार,नितीन फरांदे,संचालक नितीन काळे,तानाजी कुंभार,कराड पाटण शिक्षक सोसायटीचे संचालक दत्तात्रय जाधव,माजी संचालक सुभाष शेवाळे,माजी कोषाध्यक्ष मोहन सातपुते, डी.डी.ढेबे,संघटक उमेश माने,उमेश पवार,संपर्क प्रमुख शिवाजी निकम,राजेंद्रप्रसाद निकाळजे,प्रवक्ते अनिल डोईफोडे, एम. डी. दडस,प्रसिद्धी प्रमुख निलेश कर्वे,जुनी पेन्शन आघाडी प्रमुख नितीन घनवट, सहचिटणीस प्रवीण जोशी,विभागीय उपाध्यक्ष महादेव महानवर,किरण शिंदे,महिला आघाडी कार्याध्यक्षा रत्नमाला मोहिते-पवार,फलटण महिला आघाडी प्रमुख जयश्री कदम,सर्व तालुकाध्यक्ष संतोष कोळेकर,आबासाहेब जाधव,संजय नांगरे,सचिन पांढरपोटे, वसिम वारूणकर, ज्ञानेश्वर शिर्के, तानाजी सराटे,माजी अध्यक्ष अरुण खाडे,जालिंदर विभुते,ज्येष्ठ नेते साहेबराव कदम,संजय बांदेकर,संजय बोबडे,शरद यादव,शरद फरांदे,रामचंद्र बागल,अजित हिंगे,शशिकांत कदम, राजेंद्र सरक प्रशांत खताळ, यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

खंडाळा तालुक्यातील सेवानिवृत्त शिक्षक जीवनचंद्र देशमुख, पांडुरंग घाडगे, नाना घाडगे, शिवाजी पवार, प्रकाश धायगुडे, बाळकृष्ण धायगुडे, उत्तम घाडगे,गुलाब गायकवाड यांचा शिक्षक समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जीवनचंद्र देशमुख,दीपक रणपिसे,तानाजी यादव, अनिल डोईफोडे,उमेश पवार सुजाता पवार,शुभदा पवार यांनी परिश्रम घेतले.

यावेळी तालुक्यातील नूतन केंद्रप्रमुख,नवनियुक्त शिक्षण सेवक,जिल्हा व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक,सेवानिवृत्त शिक्षक यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी अमोल घनवट व हेमंत खरे यांनी शिक्षक समितीच्या कार्यावर प्रभावित होऊन शिक्षक समिती मध्ये प्रवेश केला.

खंडाळा तालुका प्राथमिक शिक्षक समिती नूतन कार्यकारणी पुढीलप्रमाणे

१) तानाजी यादव

 तालुका नेते

२) मुरलीधर पवार

 (तालुकाध्यक्ष)

३) आत्माराम लिमण

( सरचिटणीस)

४) राजेंद्र धायगुडे पाटील

(कार्याध्यक्ष )

५) सोमनाथ पारखे

( कोषाध्यक्ष)

६) विदेश खरात

( उपाध्यक्ष)

७) मेघा चव्हाण

महिला आघाडी प्रमुख.

८) स्वाती सरक

 पूर्व विभाग महिला आघाडी प्रमुख 

९) शुभदा पवार

पश्चिम विभाग महिला आघाडी प्रमुख

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

गणेशाच्या भक्तीत रंगले भरतनाट्यम्; ‘नृत्य विनायक’ला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गणेशाच्या भक्तीत रंगले भरतनाट्यम्; ‘नृत्य विनायक’ला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सातारा -श्री.उत्तर चिदंबरम् नटराज मंदिर आयोजित ” गणेश नृत्य संगीत महोत्सव”

Live Cricket