गणेशाच्या भक्तीत रंगले भरतनाट्यम्; ‘नृत्य विनायक’ला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अत्याधुनिक २०० व्होल्वो बसेस एसटीच्या ताफ्यात – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक विकसित भारतासाठी राज्यांची आर्थिक क्षमता बळकट करणे आवश्यक – वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल खंडाळा तालुका प्राथमिक शिक्षक समितीचा शिक्षक मेळावा उत्साहात संपन्न एसटीच्या सवलती प्राप्त प्रवाशांसाठी एनसीएमसी कार्ड नोंदणी व वितरण प्रक्रियेत बदल नदीपात्राच्या स्वच्छतेसाठी वाई NCC युनिटचा स्तुत्य उपक्रम गणेशमूर्तींच संकलन करून नगरपालिकेकडे सुपूर्द; नदीतील सूक्ष्मजीवसृष्टीच्या संरक्षणासाठी विद्यार्थ्यांचा पर्यावरणपूरक पुढाकार
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उद्योगजगत » कोयना बॅक वॉटर फेस्टीव्हल विभागांनी सन्मवयातून यशस्वी करावा- पालकमंत्री शंभूराज देसाई

कोयना बॅक वॉटर फेस्टीव्हल विभागांनी सन्मवयातून यशस्वी करावा- पालकमंत्री शंभूराज देसाई

कोयना बॅक वॉटर फेस्टीव्हल विभागांनी सन्मवयातून यशस्वी करावा– पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा : कोयना बॅक वॉटर फेस्टीव्हल 24 डिसेंबर 2026 ते 2 जानेवारी 2027 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. विविध विभागांनी त्यांच्याकडील लागणाऱ्या परवानग्या वेळेत देऊन सर्व विभागांनी सन्मवयातून हा फेस्टीव्हल यशस्वी करावा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयांचा आढावा पालकमंत्री श्री. देसाई यांनी घेतला. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कोयना बॅक वॉटर फेस्टीव्हल कालावधीत महाबळेश्वर, तापोळा यासह अन्य ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करावे, असे निर्देश देऊन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, फेस्टीव्हलसाठी चांगला आराखडा तयार करा. यामध्ये स्थानिकांनाही रोजगार निर्माण व्हावेत. फेस्टीव्हलची राज्यासह पर राज्यात प्रसिद्धी करावी. यासाठी टूर कंपन्यांशी संपर्क साधावा. बाहेरील देशातील पर्यटकही या फेस्टीव्हला येतील ते ही पहावे, असे निर्देशही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.

लोकनेते बाळासाहेब पाटील ग्रामीण रुग्णालयाच्या कामाला गती द्या- पालकमंत्री शंभूराज देसाई

पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध आहे. या कामाला गती द्यावी, असे निर्देश पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.या रुग्णालयासाठी अतिरिक्त जमिन लागणार आहे. भूसंपदानसाठी आरोग्य मंत्री यांनी निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगितले आहे. तरी जमिन मालकाशी वाटाघाटी करुन जमिन ताब्यात घ्यावी. 

जीवा महाले स्मारकाला निधी कमी पडू देणार नाही

 जीवा महाले यांचे स्मारक किल्ले प्रतापगड परिसरातच उभारले जाईल. यासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिली.

 या स्मारकासाठी समिती गठीत करण्यात आली असून यामध्ये प्रांताधिकारी वाई यांचाही समावेश करण्यात आला आहे. प्रांताधिकारी वाई यांनी स्मारकासंदर्भात वेळोवेळी आढावा घ्यावा.

समिती सदस्यांनी सांस्कृतिक विभागाडील जीवा महाले यांचे विविध छायाचित्र पाहून एक अंतिम करावे. अंतिम केलेल्या छायाचित्रानुसार पूर्णाकृती पुतळा मंजुरी घेऊन अनुभवी शिल्पकाराकडून पुतळा तयार करुन उभारण्यात येईल, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी बैठकीत सांगितले.बैठकीपूर्वी पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे व प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

गणेशाच्या भक्तीत रंगले भरतनाट्यम्; ‘नृत्य विनायक’ला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

गणेशाच्या भक्तीत रंगले भरतनाट्यम्; ‘नृत्य विनायक’ला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सातारा -श्री.उत्तर चिदंबरम् नटराज मंदिर आयोजित ” गणेश नृत्य संगीत महोत्सव”

Live Cricket