Home » Uncategorized » किसन वीर व खंडाळा कारखान्याचा शनिवारी बॉयलर प्रदिपन समारंभ

किसन वीर व खंडाळा कारखान्याचा शनिवारी बॉयलर प्रदिपन समारंभ

किसन वीर व खंडाळा कारखान्याचा शनिवारी बॉयलर प्रदिपन समारंभ

वाई प्रतिनिधी -भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना व खंडाळा येथील किसन वीर-खंडाळा सहकारी साखर कारखान्याचा सन २०२६-२७ च्या गळित हंगामाचा बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभ शनिवार (दि.२६ ) रोजी राज्याचे मदत, पुनर्वसन मंत्री व कारखान्याचे चेअरमन नामदार मकरंदआबा पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. अर्चनाताई मकरंद पाटील यांच्या शुभहस्ते खंडाळा कारखान्याचा सकाळी ९.३० तर किसन वीरचा सकाळी ११.३० वाजता होणार असल्याची माहिती किसन वीर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी दिली.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, किसन वीर व किसन वीर-खंडाळा या कारखान्यातील अंतर्गत कामे पुर्ण झालेली असुन ऊस गाळप करण्यास सज्ज आहेत. तोडणी यंत्रणेचे करारही पूर्णत्वास गेलेले असुन दोन्ही कारखान्याच्या गाळप क्षमतेएवढी यंत्रणा भरलेली असल्याने शेतकऱ्यांच्या ऊसाची तोड वेळेतच व प्रोग्रॅमप्रमाणेच होणार असल्याने ऊस उत्पादकांनी आपला पिकविलेला संपुर्ण ऊस किसन वीर व खंडाळा कारखान्यास गाळपासाठी देण्याचे आवाहनही श्री शिंदे यांनी केलेले आहे.

किसन वीर व खंडाळा कारखान्याच्या बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभास कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व सभासद बंधु-भगिनी, हितचिंतक, कंत्राटदार, वाहन मालक आणि कार्यकर्त्यानी उपस्थित रहावे, असे आवाहन व्हाईस चेअरमन प्रमोद शिदे, खंडाळा कारखान्याचे चेअरमन व्ही. जी. पवार, व्हाईस चेअरमन राजेंद्र तांबे, कार्यकारी संचालक उत्तम पाटील व दोन्ही कारखान्याच्या संचालक मंडळाने केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. दिनेश धुमाळ यांची बिनविरोध निवड

वाई बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. दिनेश धुमाळ यांची बिनविरोध निवड वाई : अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, वाई येथील वकील

Live Cricket