Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » उंब्रज’ मध्ये आता अपर तहसीलदार कार्यालय आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रयत्नांना यश प्रशासकीय सेवा आता नागरिकांच्या उंबरठ्यावर

उंब्रज’ मध्ये आता अपर तहसीलदार कार्यालय आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रयत्नांना यश प्रशासकीय सेवा आता नागरिकांच्या उंबरठ्यावर

‘उंब्रज’ मध्ये आता अपर तहसीलदार कार्यालय आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या प्रयत्नांना यश प्रशासकीय सेवा आता नागरिकांच्या उंबरठ्यावर

सातारा : सर्वसामान्य, शेतकरी व ग्रामीण भागातील जनतेला महसुली सेवा जलद गतीने आणि सहजरीत्या मिळाव्यात, यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा व ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या अंतर्गत सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील उंब्रज येथे नवीन अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला आणि प्रयत्नांना या निर्णयामुळे मोठे यश मिळाले आहे.

शासकीय कार्यालयांमधील कामकाजाचा वाढता व्याप, भौगोलिक अंतर आणि नागरिकांचा वेळ व पैसा वाचवण्यासाठी प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील प्रशासकीय विकेंद्रीकरणाला गती देत ही घोषणा केली आहे.

आतापर्यंत उंब्रज परिसरातील ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना दाखले, जमिनीचे फेरफार, संजय गांधी निराधार योजना आणि इतर महसुली कामांसाठी दूरवरच्या तालुका मुख्यालयांत फेऱ्या माराव्या लागत होत्या. मात्र, आता या नवीन अपर तहसीलदार कार्यालयांमुळे नागरिकांचे काम त्यांच्या अगदी जवळ आणि वेळेत होणार आहे. या कार्यालयांना ‘महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६’ अंतर्गत सर्व आवश्यक कायदेशीर अधिकार प्रदान केले जाणार आहेत.

“माझ्या मतदारसंघातील आणि उंब्रज परिसरातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांचा वेळ व त्रास वाचवणे हेच आमचे मुख्य ध्येय आहे. उंब्रज परिसरातील नागरिकांची ही अत्यंत जुनी आणि रास्त मागणी होती. यासाठी आम्ही महसूल विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करत होतो. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनापासून आभार मानतो. या नवीन अपर तहसीलदार कार्यालयांमुळे महसुली कामांना मोठी गती मिळेल आणि प्रशासकीय सेवा खऱ्या अर्थाने जनतेच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचतील. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. दिनेश धुमाळ यांची बिनविरोध निवड

वाई बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. दिनेश धुमाळ यांची बिनविरोध निवड वाई : अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय, वाई येथील वकील

Live Cricket