शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; शासन खंबीरपणे पाठिशी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह्याद्रीच्या समृद्ध वनांवर कुऱ्हाड भीमाशंकर व कर्जत परिसरातील वृक्षतोडीविरोधात ‘टायगर ग्रुप’ आक्रमक आंदोलनाचा इशारा धन्वंतरी पतसंस्थेमध्ये धन्वंतरी जयंतीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी केले ‘मीडिया सेवन’च्या दिवाळी अंकाचे स्वागत! संपादिका मुस्कान तांबोळी यांनी दिवाळी अंक भेट देत उपक्रमाची दिली माहिती हृदयविकार रुग्णांसाठी १२ रोजी सातारा, वाई येथे मोफत मार्गदर्शन शिबिर सकाळच्या नास्त्यात तर्री पोहा; शेतकरी कुटुंबात मुख्यमंत्र्यांची भाऊबीज पुढल्या वर्षी वहिनींना घेऊन या; अरूणाताईंचा मुख्यमंत्र्यांना आग्रह
Home » Uncategorized » अ‍ॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी काढणे बंधनकारक- जिल्हा माहिती अधिकारी हेमंतकुमार चव्हाण

अ‍ॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी काढणे बंधनकारक- जिल्हा माहिती अधिकारी हेमंतकुमार चव्हाण

अ‍ॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी काढणे बंधनकारक– जिल्हा माहिती अधिकारी हेमंतकुमार चव्हाण

सातारा  : महाराष्ट्र शासनामार्फत राज्यात अ‍ॅग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये खातेदार असणाऱ्या शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यावर त्यांना फार्मर आयडी (शेतकरी नोंदणी क्रमांक) मिळणार आहे. अद्याप ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढला नसेल त्यांनी तो त्वरित काढून घ्यावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी हेमंतकुमार चव्हाण यांनी केले आहे.

माण तालुक्यातील डंगीरेवाडी येथील महात्मा फुले गणेशोत्सव मंडळ येथे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने लोकसंवाद-२०२६ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष युवराज राऊत, सत्यवान राऊत यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृषी विषयक योजना जसे की पीक विमा, फळपीक विमा योजना, नैसर्गिक आपत्ती पीक नुकसान भरपाई, पी एम किसान योजना इत्यादींचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. तसेच केंद्र शासनाने पी. एम. किसान योजनेमधील लाभार्थ्यांना अ‍ॅग्रीस्टॅकमध्ये नोंदणी करणे बंधनकारक केले आहे. याशिवाय पी.एम. किसान पोर्टलवर नवीन स्वयंनोंदणी करण्यासाठी देखील अ‍ॅग्रीस्टॅकमधील फार्मर आयडी बंधनकारक केला आहे.

फार्मर आयडीसाठी नोंदणी करण्यासाठी mhfr.agristack.gov.in या पोर्टलवर शेतकऱ्यांना स्वतः नोंदणी करता येणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी या पोर्टलचा वापर करून आपली नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; शासन खंबीरपणे पाठिशी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; शासन खंबीरपणे पाठिशी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालना : राज्यात दुष्काळाचे संकट निर्माण झाले असले, तरी

Live Cricket