अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील शैक्षणिक वर्षे २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ मधील प्रलंबित अर्ज दि.१५ सप्टेंबर २०२६ पर्यंत तात्काळ निकाली काढण्याबाबत आवाहन
सातारा -भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती तसेच मॅट्रिकोत्तर शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती (फ्रीशिप) योजनेंतर्गत अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील अर्जदार, (विद्यार्थीस्तर) आणि महाविद्यालय (संस्था) स्तरावर प्रलंबित असलेले शिष्यवृत्तीचे सर्व अर्ज तातडीने निकाली काढण्यासाठी समाज कल्याण विभागामार्फत विशेष कार्यवाही करण्यात येत आहे. त्यासाठी महाडीबीटी १.० पोर्टल (https://dbtworkflow.mahaonline.gov.in/) दि.१५ सप्टेंबर २०२६ पर्यंत कार्यान्वित करण्यात आली आहे.
ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटींमुळे परत (Reverted) आले आहेत अशा विद्यार्थ्यांशी संबंधित महाविद्यालयांनी तातडीने संपर्क साधून पुढील दोन दिवसांत त्रुटींची पूर्तता करून परिपूर्ण अर्ज प्राप्त करून घ्यावेत व महाविद्यालयांनी त्यांच्या लॉगिनमध्ये प्रलंबित असलेले वर्ष व योजना निहाय (पहिला व दुसरा हप्त्याकरिताचे) सर्व अर्ज त्वरित तपासावेत, अर्जातील त्रुटी पूर्ण करून ते अर्ज जिल्हा स्तरावर मंजुरीसाठी महाडीबीटी प्रणाली १.० द्वारे ऑनलाईनरित्या तात्काळ अग्रेषित (Forward) करावेत. तसेच अपात्र असलेले अर्ज थेट महाविद्यालयस्तरावरुन स्पष्ट कारणे नमूद करुन नामंजूर (Reject) करावेत. अर्ज निकाली काढावयाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थी निहाय, शैक्षणिक वर्षनिहाय (सन २०१८-१९ ते २०२५-२६) व अभ्यासक्रम निहाय डेटा त्यांच्या लॉगीनवरुन डाऊनलोड करुन गुगलशीट मध्ये जतन करुन ठेवावा. उपरोक्त विहित मुदतीत कार्यवाही न झाल्यास विद्यार्थी लाभापासून वंचित राहील्यास याची जबाबदारी संबंधित विद्यार्थ्यांची/महाविद्यालय/संस्थेची राहील.
तरी सातरा जिल्हयामधील सर्व संबंधित विद्यार्थी व महाविद्यालयांनी दि.१4 सप्टेंबर २०२६ पर्यंत त्यांच्यास्तरावरील सर्व प्रलंबित अर्जातील त्रुटी पूर्ण करून अर्ज जिल्हा स्तरावर मंजुरीसाठी महाडीबीटी प्रणाली १.० द्वारे ऑनलाईनरित्या तात्काळ अग्रेषित (Forward) करावेत, असे आवाहन श्री.सुनिल जाधव, सहायक आयुक्त, समाज कल्याण, सातारा यांनी केले आहे.





