शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; शासन खंबीरपणे पाठिशी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह्याद्रीच्या समृद्ध वनांवर कुऱ्हाड भीमाशंकर व कर्जत परिसरातील वृक्षतोडीविरोधात ‘टायगर ग्रुप’ आक्रमक आंदोलनाचा इशारा धन्वंतरी पतसंस्थेमध्ये धन्वंतरी जयंतीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी केले ‘मीडिया सेवन’च्या दिवाळी अंकाचे स्वागत! संपादिका मुस्कान तांबोळी यांनी दिवाळी अंक भेट देत उपक्रमाची दिली माहिती हृदयविकार रुग्णांसाठी १२ रोजी सातारा, वाई येथे मोफत मार्गदर्शन शिबिर सकाळच्या नास्त्यात तर्री पोहा; शेतकरी कुटुंबात मुख्यमंत्र्यांची भाऊबीज पुढल्या वर्षी वहिनींना घेऊन या; अरूणाताईंचा मुख्यमंत्र्यांना आग्रह
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सातारा – केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेत प्रति थेंब अधिक पिकअंतर्गत यंदाचे वर्ष २०२६-२७ मध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतक-यांसाठी सूक्ष्म सिंचनाचा अनुदानाचा निधी मंजूर आहे. त्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी या संकेतस्थळावर भेट देऊन १५ ऑक्टोबर २०२६ पूर्वी अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे. 

शेतकऱ्यांनी अर्ज सादर करताना सर्व माहिती अचूक भरणे अपेक्षित आहे. ज्याद्वारे अर्ज मंजूर होण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होईल. योजनेचा लाभ एका शेतकऱ्याला कमाल पाच हेक्टर क्षेत्र मर्यादत दिला जातो. शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करावेत. अर्जासाठी https:///mahadbt.maharashtra.gov.in/farmer/agrilogin या संकेतस्थळावर भेट दयावी. या पोर्टलवर प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करताना शेतकऱ्यांकडे अॅग्रिस्टॅक फार्मर आयडी हा ओळख पडताळणीसाठी आवश्यक शासकीय कागदपत्रे, बँक पासबुक आणि जातीचा दाखला असणे आवश्यक आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी आपल्या परिसरातील आपले सरकार सेवा केंद्र, कृषी विभागाचे अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी थेट संपर्क साधावा, असेही आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्रीमती फरांदे यांनी केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; शासन खंबीरपणे पाठिशी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; शासन खंबीरपणे पाठिशी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालना : राज्यात दुष्काळाचे संकट निर्माण झाले असले, तरी

Live Cricket