राजेंद्रशेठ राजपुरे यांच्या हस्ते जिल्हा परिषद आदर्श शाळा राजपुरी ज्ञानमंदिराच्या नव्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा संपन्न
पाचगणी प्रतिनिधी – राजपुरी येथील शतकोत्तर परंपरा लाभलेल्या जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा (ज्ञानमंदिर) च्या नव्या भव्य व प्रशस्त इमारतीचा भूमिपूजन सोहळा शुक्रवार, दिनांक २ जानेवारी रोजी सातारा जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी शीतलताई राजपुरे, भाऊसाहेब दानवले, दगडू ढेबे, संजय पार्टे, लक्ष्मण हिरवे, रवी भिलारे, अमित कारंडे, संदीप राजपुरे, सुरेंद्र भिलारे, अरविंद चोरट, उद्धव निकम, अमोल गायकवाड, योगिता पोळ, निलोफर सय्यद तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या दीर्घकालीन मेहनतीला व स्वप्नांना या भूमिपूजनाच्या निमित्ताने नवी दिशा मिळाली आहे. भावी पिढीच्या शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या ज्ञानमंदिराच्या नव्या इमारतीमुळे विद्यार्थ्यांना अद्ययावत सुविधा व प्रेरणादायी शैक्षणिक वातावरण उपलब्ध होणार आहे.
बाळासो सोनटक्के यांच्या मंत्रोपचारातून विधीवत कार्यक्रम पार पडला. शाळा उभारणीसाठी ९१ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या निधीतून आधुनिक व सुसज्ज शाळा इमारत साकारली जाणार आहे.




