भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादर; पेपरफुटीविरोधी कायदा अधिक कठोर करण्याची शिफारस ड्रॅगन पॅलेस टेम्पल’मुळे नागपूरची जागतिक स्तरावर ओळख – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासकीय कार्यालयांतील ‘व्हॉट्सॲप वेब’च्या वापराबाबत गृह मंत्रालयाचा सतर्कतेचा इशारा अनधिकृत प्रवेश, माहितीची चोरी आणि सायबर फसवणुकीचा धोका अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करावेत अजितदादांचे पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करणार; शहराच्या प्रत्येक प्रश्नासाठी खंबीरपणे पाठीशी – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार ११ लाखांहून अधिक रुग्णांना आयुष्मान भारत व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » महाबळेश्वरातील हॉटेल, रिसॉर्ट आस्थापनांना रोजगार व कौशल्य योजनांची माहिती

महाबळेश्वरातील हॉटेल, रिसॉर्ट आस्थापनांना रोजगार व कौशल्य योजनांची माहिती

महाबळेश्वरातील हॉटेल, रिसॉर्ट आस्थापनांना रोजगार व कौशल्य योजनांची माहिती

सेवा संकल्प अभियानांतर्गत आस्थापनांना प्रत्यक्ष भेटी; हॉटेल असोसिएशनसोबत संयुक्त बैठक

सातारा : शासनाच्या निर्देशानुसार राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा यांच्यावतीने महाबळेश्वर तालुक्यातील सर्व्हिस सेक्टरमधील विविध आस्थापनांना प्रत्यक्ष भेटी देऊन रोजगार व कौशल्य विकास योजनांबाबत जनजागृती करण्यात आली.

अभियानांतर्गत महाबळेश्वर तालुक्यातील हॉटेल्स, रिसॉर्ट्स तसेच सेवा क्षेत्रातील विविध आस्थापनांच्या प्रमुखांची भेट घेऊन शासनाच्या रोजगार व कौशल्य विकासाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच महाराष्ट्र शासनाच्या रोजगार व कौशल्य पोर्टलबाबत मार्गदर्शन करून आस्थापनांनी पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी सर्व्हिस क्षेत्रातील हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत विशेष संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत रोजगार मेळावे, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना तसेच अन्य कौशल्य व रोजगारविषयक योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.

शासनाच्या अधिकृत पोर्टलवर जास्तीत जास्त आस्थापनांनी नोंदणी केल्यास त्यांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होण्यास मदत होईल, तसेच रोजगाराच्या शोधात असलेल्या उमेदवारांना विविध संधी उपलब्ध होतील, याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली. काही आस्थापनांचे नोंदणी फॉर्म प्रत्यक्ष जागेवरच भरून घेण्यात आले.

विभागाच्या योजनांची माहिती जाणून घेतल्यानंतर हॉटेल व सेवा क्षेत्रातील आस्थापना प्रतिनिधींनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या अभियानामुळे सेवा क्षेत्रातील आस्थापनांना शासनाच्या रोजगार व कौशल्यविषयक योजनांचा लाभ घेण्यास तसेच स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

या अभियानात हॉटेल असोसिएशनचे सचिव रमेश कौल, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त अ. मु. पवार तसेच लिपिक टंकलेखक का. रा. पालवे यांनी सहभाग घेतला. सेवा संकल्प अभियानांतर्गत तालुक्यातील इतर भागांतही अशाच प्रकारची जनजागृती व आस्थापना भेटी सुरू राहणार आहेत.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादर; पेपरफुटीविरोधी कायदा अधिक कठोर करण्याची शिफारस

भरती परीक्षा प्रक्रियेत व्यापक सुधारणांसाठी उच्चस्तरीय समितीचा दुसरा अहवाल शासनास सादर; पेपरफुटीविरोधी कायदा अधिक कठोर करण्याची शिफारस  संघटित परीक्षा गैरप्रकारांत

Live Cricket