सह्याद्रीच्या समृद्ध वनांवर कुऱ्हाड भीमाशंकर व कर्जत परिसरातील वृक्षतोडीविरोधात ‘टायगर ग्रुप’ आक्रमक आंदोलनाचा इशारा धन्वंतरी पतसंस्थेमध्ये धन्वंतरी जयंतीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी केले ‘मीडिया सेवन’च्या दिवाळी अंकाचे स्वागत! संपादिका मुस्कान तांबोळी यांनी दिवाळी अंक भेट देत उपक्रमाची दिली माहिती हृदयविकार रुग्णांसाठी १२ रोजी सातारा, वाई येथे मोफत मार्गदर्शन शिबिर सकाळच्या नास्त्यात तर्री पोहा; शेतकरी कुटुंबात मुख्यमंत्र्यांची भाऊबीज पुढल्या वर्षी वहिनींना घेऊन या; अरूणाताईंचा मुख्यमंत्र्यांना आग्रह दिव्यांगांच्या आयुष्यात आशेचा प्रकाश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी साजरी केली दिव्यांग बांधवांसोबत आनंदाची दिवाळी!
Home » राज्य » निवृत्तीवेतनधारकांसाठी ७ सप्टेंबररोजी सातारा कोषागारात कार्यशाळा

निवृत्तीवेतनधारकांसाठी ७ सप्टेंबररोजी सातारा कोषागारात कार्यशाळा

निवृत्तीवेतनधारकांसाठी ७ सप्टेंबररोजी सातारा कोषागारात कार्यशाळा

सातारा – राज्य शासकीय निवृत्तीवेतन धारक आणि कुटूंब निवृत्तीवेतन धारकांना राज्य शासनाने विकसित केलेल्या महा उपलब्धी या अधिकृत मोबाइल ॲपद्वारे निवृत्तीवेतनविषयक सेवा आता सहज उपलब्ध होणार आहेत. या ॲपमुळे निवृत्तीवेतनाशी संबंधित माहिती त्वरीत, अचूक व पारदर्शक स्वरुपात उपलब्ध होणार असून निवृत्तीवेतनधारकांची कोषागार कार्यालयात प्रत्यक्ष भेटीची आवश्यकता कमी होणार आहे. ॲपच्या वापराबाबत माहिती व प्रात्यक्षिक देण्यासाठी तसेच निवृत्तीवेतन धारकांच्या अडीअडचणी आणि शंकांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालय, सातारा आणि सेवानिवृत्ती कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा कोषागार कार्यालयात सोमवार दि. ७ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सर्व कर्मचारी संघटना व निवृत्तीवेतनधारक संघटनांचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी या कार्यशाळेस उपस्थित रहावे, असे आवाहन कोषागार अधिकारी, श्रीमती आरती नांगरे यांनी केले आहे.

तसेच सेवानिवृत्ती होणा-या कर्मचा-यांचे बाबतीत त्यांचे निवृत्तीवेतन प्रकरण सुलभतेने महालेखापाल कार्यालयास सादर होण्यासाठी वित्त विभाग १५ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार शासनाने विकसित केलेल्या नमुना 5-अ बाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच ज्या निवृत्तीवेतनधारकांना महा उपलब्धी ॲप वापरताना काही अडचणी येत असतील तर त्यांचे निराकरणही त्याचदिवशी अप्पर कोषागार अधिकारी (निवृत्तीवेतन शाखा) प्रविण पाटील व त्यांचे सहकारी करणार आहेत.

०००

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सह्याद्रीच्या समृद्ध वनांवर कुऱ्हाड भीमाशंकर व कर्जत परिसरातील वृक्षतोडीविरोधात ‘टायगर ग्रुप’ आक्रमक आंदोलनाचा इशारा

सह्याद्रीच्या समृद्ध वनांवर कुऱ्हाड भीमाशंकर व कर्जत परिसरातील वृक्षतोडीविरोधात ‘टायगर ग्रुप’ आक्रमक आंदोलनाचा इशारा महाबळेश्वर :-रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील साई

Live Cricket