Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » युवानायक विकास(अण्णा शिंदे )यांच्या नेतृत्वात ज्येष्ठांकरिता श्रावण दर्शन यात्रा दर्शन

युवानायक विकास(अण्णा शिंदे )यांच्या नेतृत्वात  ज्येष्ठांकरिता श्रावण दर्शन यात्रा दर्शन 

युवानायक विकास(अण्णा शिंदे )यांच्या नेतृत्वात  ज्येष्ठांकरिता श्रावण दर्शन यात्रा दर्शन 

श्रावण दर्शन यात्रेसाठी माऊली ज्येष्ठ नागरिक संघटनेची कोल्हापूर महालक्ष्मी व बाळूमामा दर्शन यात्रा – शिवसेना वाई विधानसभा प्रमुख श्री विकास (आण्णा) राधाबाई दिनकर शिंदे सहकार्यामुळे शक्य

वाई प्रतिनिधी -माऊली ज्येष्ठ नागरिक संघटना, क्षेत्र धोम  श्रावण महिन्याच्या निमित्ताने महालक्ष्मी (कोल्हापूर) व बाळूमामा (आदमापुर) यांचे दर्शन घेण्यासाठी यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत जवळपास ४० ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला. संपूर्ण यात्रा शिवसेना वाई विधानसभा प्रमुख श्री विकास (आण्णा ) राधाबाई दिनकर शिंदे यांनी आपल्या स्वखर्चातून व शिवसेना पक्ष यांच्या वतीने आयोजित केली आहे.

या उपक्रमासाठी त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. यात्रेच्या गाडीचे पूजन व यात्रेच्या शुभारंभप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये वाई तालुका शिवसेना तालुकाप्रमुख रवींद्र आप्पा भिलारे, दत्ता पोळ (अभेपुरी गण उप विभाग प्रमुख ) , सचिन वायदंडे ( बैंड बंजो संघटना सातारा जिल्हा अध्यक्ष), सोपान चिकणे विभाग प्रमुख यशवंतनगर जिल्हा परिषद गट,गणेश साठे ( प्रसिद्धी प्रमुख) ,अमृत गायकवाड ( माऊली जेष्ठ नागरिक संघ धोम ) ,सचिन बुलुंगे (शिवसेना शाखा प्रमुख धोम ) , सोहम पोळ व शिवसैनिक आदींचा समावेश होता.या यात्रेमुळे ज्येष्ठ नागरिकांना अध्यात्मिक समाधान तर मिळालेच, पण सामाजिक एकोपा व एकत्र येण्याचा एक सुंदर अनुभवही मिळाला. यात्रेतील सहभागी सदस्यांनी विकास अण्णा शिंदे यांचे विशेष आभार मानले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात

Post Views: 33 शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात सातारा: करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव पाटील

Live Cricket