समाजसेवेतून राजकारणाची नवी दिशा देणारे युवा नेतृत्व : सुनील बगाडे
पाचगणीच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न उराशी बाळगून पर्यटन, रोजगार आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले शांत, संयमी आणि आश्वासक युवा नेतृत्व
पाचगणी(प्रवीण घाडगे )पाचगणी शहरातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या कार्यशैलीने स्वतंत्र ओळख निर्माण करणारे मा.सुनील बगाडे हे समाजसेवेतून राजकारणाची नवी दिशा देणारे आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी नाळ जोडलेले आश्वासक युवा नेतृत्व म्हणून परिचित आहेत. शांत, संयमी स्वभाव आणि समाजासाठी काहीतरी सकारात्मक करण्याची धडपड यामुळे पाचगणी परिसरातील युवा वर्गामध्ये त्यांच्याबद्दल विशेष आकर्षण निर्माण झाले आहे.
राजकीय पार्श्वभूमी लाभलेल्या सुनील बगाडे यांनी समाजसेवेला आपल्या सार्वजनिक जीवनाचा केंद्रबिंदू मानला आहे. पाचगणी परिसरातील सर्वसामान्य तरुणांना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात, तसेच पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून स्थानिक युवकांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी त्यांची सातत्याने धडपड सुरू आहे.
पाचगणी हे जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असूनही पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक नागरिक आणि तरुणांना आणखी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असा त्यांचा ठाम विश्वास आहे. याच उद्देशाने त्यांनी विविध परदेशी पर्यटनस्थळांना भेटी देऊन तेथील पर्यटन व्यवस्था, नियोजन आणि रोजगाराच्या संधींचा अभ्यास केला आहे. या अनुभवाच्या आधारे पाचगणीसारख्या थंड हवेच्या पर्यटनस्थळी आधुनिक आणि नाविन्यपूर्ण पर्यटन योजना राबविण्याचे त्यांचे नियोजन आहे.
पाचगणी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यटनाला चालना देतानाच स्थानिक तरुणांना रोजगार आणि व्यवसायाच्या संधी मिळाव्यात, यासाठी भविष्यात विविध उपक्रम राबविण्याचा त्यांचा मानस आहे. पाचगणीला केवळ पर्यटनस्थळ म्हणून नव्हे, तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याचे त्यांचे स्वप्न आहे.
राजकीय क्षेत्रातही सुनील बगाडे यांनी आपला स्वतंत्र जनसंपर्क निर्माण केला आहे. पाचगणी शहर आणि परिसरात त्यांना मानणारा मोठा युवा वर्ग असून, युवकांच्या प्रश्नांबाबत ते सातत्याने सकारात्मक भूमिका घेताना दिसतात. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध असून, या माध्यमातून पाचगणी परिसराच्या विकासासाठी विविध प्रश्नांवर पाठपुरावा करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
सामाजिक क्षेत्रातही सुनील बगाडे यांचे योगदान उल्लेखनीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय ठरले आहे. सामाजिक एकोपा, युवकांचा सहभाग आणि समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन कार्यक्रमांचे आयोजन करण्यावर त्यांचा भर राहिला आहे.
समाजसेवा, पर्यटन विकास, युवकांना रोजगाराच्या संधी आणि पाचगणीच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन कार्यरत असलेले सुनील बगाडे यांचे नेतृत्व आगामी काळात पाचगणीच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात अधिक प्रभावी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

शांत स्वभाव संयमी नेतृत्व समाजसेवेची बांधिलकी पर्यटन विकासाचे व्हिजन आणि युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी धडपड.आश्वासक युवा नेतृत्व मा. सुनील बगाडे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रात उज्ज्वल यश लाभो, तसेच पाचगणीच्या विकासाचे आपले स्वप्न साकार होवो, ही मनःपूर्वक सदिच्छा!




