ओबीसी वर्गाला सन्मान मिळवून देणार – आ. योगेश टिळेकर
खंडाळा : अठरा पगड जाती व बारा बलुतेदारांना बरोबर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजानी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले होते. त्याच शिवप्रभूंच्या व बहुजनांच्या महाराष्ट्रात आज चाललय काय? जाती जाती मध्ये भांडणे लावून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचे काम महाराष्ट्रात काही मंडळी करत आहेत. महाराष्ट्रात जातीपातीमध्ये विखुरलेला बहुजनांना हिंदु बहुजन रॅलीच्या माध्यमातून एकत्र आणण्याचे काम आगामी काळात करणार असून सरकारने ओबीसी महामंडळ सुरु करण्याचे काम केले. ओबीसींना मोठया प्रमाणावर निधी व ताकद दिली आहे. आगामी काळात मायक्रो ओबीसी व ओबीसींना सन्मान मिळवून देण्याचे काम करु असे प्रतिपादन विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी केले.
संत सावता क्रांती परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वाखालील नायगाव ते चौंडी यात्रेचा प्रारंभ नायगाव येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांना अभिवादन करुन करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र ओबीसी प्रभारी खासदार संगमलाल गुप्ता, ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते, रंजना टिळेकर, गिताजंली अभंग, सरपंच स्वाती जमदाडे, अनिरुद्ध गाढवे, ऋषीकेश धायगुडे, हर्षवर्धन शेळके आदी मान्यवर उपस्थित होते
खासदार संगमलाल गुप्ता म्हणाले, सोशित लोकांना शिक्षण देण्याचे काम महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी केले. बहुजन हिंदु समाजाला जागे करण्यासाठी आ. योगेश टिळेकर यांनी ही यात्रा सुरु केली केली आहे. महाराष्ट्र ही साधु संताची राष्ट्रपुरुषांची भूमी आहे. देशात सोशित वंचित घटकासाठी तसेच आबीसी मायक्रो ओबीसींसाठी भाजपा सरकार काम करत आहे. सोशित घटकांना सन्मान देण्याचे काम भाजपा सरकार करत आहे.
प्रास्ताविक निखील झगडे यांनी केले, वैभव कांबळे यांनी आभार मानले.
