Home » राज्य » शेत शिवार » येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आमदार मनोजदादा घोरपडे

येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आमदार मनोजदादा घोरपडे

येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आमदार मनोजदादा घोरपडे

उंब्रज येथील जनता दरबारात 200 पेक्षा जास्त प्रकरणी निकाली 

सातारा प्रतिनिधी -कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या वतीने कराड उत्तर मधील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात येते. उंब्रज येथील रुक्मिणी मंगल कार्यालय येथेल जनता दरबारमध्ये 200 पेक्षा जास्त प्रश्नांचे निवारण करण्यात आले आहे. जनता दरबार मध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार मनोजदादा घोरपडे यांनी केली. यावेळी तहसीलदार कल्पना ढवळे मॅडम, बीडिओ प्रताप पाटील, महेशबाबा जाधव,संपतभाऊ जाधव, सुरेशतात्या पाटील, शंकरकाका शेजवळ, माणिक जाधव यांची उपस्थिती होती.

        कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील कोलाटी समाजातील 36 नवीन रेशनिंग कार्डचे वाटप करण्यात आले. श्रावणबाळ योजनेअंतर्गत निराधार महिलांना पेन्शनचे वाटप करण्यात आले. जागेवरती वारस नोंदी करण्यात आल्या. त्याचबरोबर महसूल,शैक्षणिक, भूममापण, इत्यादीचे अनेक प्रकरने निकाली काढण्यात आली. हणबरवाडी उपसा सिंचन योजनेचे चे पाणी मसूर विभागाला व धोम डाव्या कालव्याचे पाणी वाठार व रहीमतपूर विभागाला दिल्याबद्दल आमदार मनोदादा घोरपडे यांचे तेथील शेतकऱ्यांनी शाल श्रीफळ देऊन स्वागत केले.

              यावेळी बोलताना आमदार मनोजदादा घोरपडे म्हणाले जनता दरबारमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे प्रश्न सोडवण्यासाठी कायमच मी कटिबद्ध असून या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक माणसाचे समाधान करणे त्याचबरोबर त्याची छोटी मोठी प्रकरणे निकाली काढण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात येते. प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जणता दरबाराचे आयोजन करण्यात येते. यावेळी विलास आटोळे, दिगंबर भिसे, प्रशांत भोसले, जयवत नाना जाधव,विनायक जाधव, चंद्रकांत जाधव, महेश जाधव, शहाजी आप्पा मोहिते, प्रतिभा कांबळे, यांच्या सहकार उत्तर मधील भाजपा पदाधिकारी नागरिक महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. 

जनता दरबारामध्ये येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात ? गावात तुम्ही कोणत्या गटाला काम करता? कोणाला मत दिले ? तुमच्या गावात मला किती मतदान झाले? हे न विचारता त्याचे काम करणे एवढंच माझं कर्तव्य आहे .

 आमदार मनोजदादा घोरपडे

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बावधन ग्रामपंचायत सरपंच पदी सौ वंदना जगदीश कांबळे यांची निवड

Post Views: 137 बावधन ग्रामपंचायत सरपंच पदी सौ वंदना जगदीश कांबळे यांची निवड वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)आज झालेल्या बावधन ग्रामपंचायतीच्या

Live Cricket