यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या च्या विद्यार्थ्यांचे जीपॅट परीक्षेत यश
यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्स (एन. बी. इ. एम. एस. ) तर्फे घेण्यात आलेल्या जीपॅट (ग्रॅज्युएट फार्मसी ऍप्टिट्यूड) परीक्षेत भरघोस यश मिळवले. या परीक्षेत विराज गडकरी, प्रथमेश कांबळे आणि नेहा कांबळे यांनी यश संपादन केले.
यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये नेहमीच विद्यार्थी स्पर्धात्मक दृष्ट्या तयार होण्यासाठी विशेष कष्ट घेतले जातात. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे ज्ञान अवगत व्हावे यासाठी विविध सेल कार्यरत करण्यात आले आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशोदा टेक्निकल कॅम्पसचे विद्यार्थी सहभागी होत असतात. विद्यार्थ्यांना गेट एक्झामिनेशन, बँकिंग एक्झामिनेशन, एमपीएससी यूपीएससी एक्झामिनेशन यासारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेण्यासाठी ग्रंथालयामध्ये देखील स्वतंत्र व्यवस्था आणि संदर्भ पुस्तकांची उपलब्धता करण्यात आली आहे.
यशोदा शिक्षण संस्थेमध्ये फार्मसी च्या पदवी अभ्यासक्रम चाचणी (जीपॅट) ची तयारी करून घेण्यासाठी जीपॅट सेल ची स्थापना करण्यात आली. त्याअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी गेस्ट लेक्चर घेण्यात आले. मुलांच्या सरावासाठी चाचणी परीक्षा घेण्यात आल्या. या सर्व गोष्टींचा फायदा करून घेत यशोदाच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत राष्ट्रीय स्तरावर गुणानुक्रम पटकावले. यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे, उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे, प्राचार्य व संचालक डॉ.व्ही के रेदासानी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात अशीच प्रगती करावी अशी आशा व्यक्त केली. जीपॅट सेल प्रमुख डॉ. एस एच रोहने यांचे यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.