यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या NSS युनिट कडून श्रमसंस्कार शिबिराचे यशस्वी आयोजन
यशोदा टेक्निकल कॅम्पस, सातारा येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) युनिटने नुकतीच सात दिवसांची ग्राम स्वच्छता मोहिम आसगाव, सातारा येथे राबवली. या मोहिमेचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करणे होता. NSS युनिटचे हे उपक्रम विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान देत नाही, तर त्यांच्यात सामाजिक जबाबदारीची भावना जागृत करत आहेत. यशोदा टेक्निकल कॅम्पस, सातारा आणि आसगाव ग्रामपंचायत, ता-जि-सातारा यांच्य संयुक्त विद्यमाने दिसात दिवसांचा विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजित केले गेले.
मोहिमेची सुरुवात विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची शपथ घेऊन केली. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी गावातील मुख्य रस्ते आणि शाळा परिसर स्वच्छ केले. विद्यार्थ्यांनी कचरा संकलन, प्लास्टिक मुक्तता, गटारी सफाई आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले. विद्यार्थ्यांचा उत्साह आणि मेहनत पाहून गावातील लोकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गावकऱ्यांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यात NSS च्या या उपक्रमाचा मोठा वाटा आहे.
नॅशनल सर्व्हिस स्कीम (NSS) हि एक अशी योजना आहे जी विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञानच नाही, तर सामाजिक कार्यांमध्ये सहभागी होण्याची प्रेरणा देते. या योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना विविध सामाजिक आणि पर्यावरणीय समस्यांवर काम करण्याची संधी मिळते. विद्यार्थ्यांमध्ये संघटनात्मक कौशल्ये, नेतृत्व कौशल्ये, तसेच विविध कार्यांची अंमलबजावणी करण्याची क्षमता विकसित होते.
या शिबिरात यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस चे अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे, उपाध्यक्ष श्री. अजिंक्य सगरे, प्राचार्य डॉ. व्ही. एस. पाटील, कुलसचिव श्री. गणेश सुरवसे यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन मोलाचे योगदान देण्याचे आवाहन केले.
या शिबिरामुळे यशोदा टेक्निकल विद्यार्थी सर्व बाजूंनी मदत झाली आणि यापुढे यशोदा टीम आणि आसगाव गावाची टीम गाव विकास काम करेल, आशी ग्वाही प्राचार्य श्री व्ही. एस. पाटील सरांनी दिले आहे.शिबिराचे कार्यक्रम अधिकारी श्री.पी.जी. बोराटे सर आणि सचिव कु. आदिती भोसले यांचे बहुमोल योगदान लाभले.
आसगावच्या सरपंच सौ सुनंदा शिंदे, उपसरपंच श्री. हिरालाल शिंदे, तंटामुक्त अभियान अध्यक्ष श्री. कृष्णदेव शिंदे, श्री. रामकृष्ण शिंदे, श्री. दत्तात्रय शिंदे तशेच आसगाव ग्रामसेवक मॅडम, सौ भगत यांनी विद्यार्थ्यांच्या निःशर्त समर्पणाबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त केली आहे.
या मोहिमेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी गावातील नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. प्लास्टिक आणि कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन, गटारी सफाई आणि शौचालयांचे योग्य उपयोग यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी गावातील लोकांना स्वच्छतेच्या विषयावर मार्गदर्शन केले आणि स्वच्छतेच्या महत्त्वाविषयी चर्चा केली. यामुळे गावातील नागरिकांमध्ये स्वच्छता मोहिमेचा संदेश पोहचला.
NSS युनिटच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ झाली. त्यांनी आपल्या कर्तव्यापासून मागे हटले नाही आणि आपल्या सहलीचा त्याग करून समाजासाठी काम केले. विद्यार्थी आणि स्थानिक लोक यांच्यात एक सशक्त संवाद निर्माण झाला, जो भविष्यात कधीतरी समाजाच्या विकासात योगदान देईल.
यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या NSS युनिटने राबवलेल्या या स्वच्छता मोहिमेचा उद्देश ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ या ध्येयाकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण झाली आहे, तसेच गावातील वातावरणाला शुद्ध ठेवण्याचा ठोस प्रयत्न करण्यात आला आहे. ही स्वच्छता मोहिम ग्रामीण भागात वाढत्या पर्यावरणीय समस्यांना सामोरे जाण्यासाठी एक आदर्श ठरली आहे.
या मोहिमेत विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या श्रमांच्या महत्त्वाची जाणीव झाली आणि त्यांनी स्थानिक लोकांच्या मदतीने एकत्र काम करण्याची प्रेरणा घेतली. NSS युनिटच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासात मदत झाली आहे. भविष्यात देखील यशोदा टेक्निकल कॅम्पसचे NSS युनिट अशा प्रकारच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेईल, याची खात्री आहे.
यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या NSS युनिटच्या या समर्पित कार्यामुळे एक सामाजिक बदल घडवून आणला गेला आहे, ज्यामुळे ‘स्वच्छ भारत’ हे स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल टाकले गेले आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्व समावेशक विकासासाठी अशा प्रकारच्या श्रमसंस्कार शिबिरांचे महत्त्व मोठे आहे. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय कर्तव्याची जबाबदारीची जाणीव करून देणारे अशा प्रकारचे उपक्रम मोठ्या प्रमाणावर पार पाडण्यासाठी यशोदा इन्स्टिट्यूट विशेष लक्ष देत आहे.
उपाध्यक्ष प्रा अजिंक्य सगरे
