यशोदा इन्स्टिट्यूटच्या डी फार्मसी ची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत80 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण , निकालात मुली अव्वल
यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या फॅकल्टी ऑफ डी. फार्मसी विभागाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी तब्बल 80% विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यसह प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण होण्याची किमया साकारली आहे.
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण महामंडळ यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या डी फार्मसी या पदविका अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांमध्ये यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले. प्रेरणा प्रदीप गुरव (85.9%), श्रेया शंकर गिरी (84%) आणि अंकिता मारुती जाधव (83.18%) या विद्यार्थिनींनी महाविद्यालयामध्ये अनुक्रमे प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला.
व्यावसायिक आणि तंत्रशिक्षणामध्ये होणारे बदल अचूक प्रकारे ओळखून ते आत्मसात केल्यामुळेच या स्तरावर यश संपादन करता आले असे फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. विवेककुमार रेदासनि यांनी सांगितले. महाविद्यालय मध्ये असणाऱ्या सर्व सुविधा नियुक्त प्रयोगशाळा, उच्चविद्याभूषित आणि अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज ग्रंथालय, संगणक विभाग तसेच वेळोवेळी मिळणारे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे, उपाध्यक्ष प्रा अजिंक्य सगरे यांच्या मार्गदर्शनामुळे निकालातील सातत्य राखता आले असे ते म्हणाले.
यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून योजनांची आखणी केली जाते, नवनवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने उपक्रमशील शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्यांच्या मधील दूरी कमी करण्याबरोबरच व्यावसायिक शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कलागुणांना आणि व्यक्तिमत्व विकासाला प्रथम प्राधान्य दिले जाते. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल मार्फत पुरवले जाणारे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना नोकरीची दिशा स्पष्ट करण्यासाठी बहुमूल्य ठरते.
विद्यार्थ्यांच्या या विषयाबद्दल संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक दशरथ सगरे, उपाध्यक्ष प्राध्यापक अजिंक्य सगरे, कार्यकारी संचालिका सौ नम्रता सगरे, प्राचार्य, विभाग प्रमुख शिक्षक आदींनी त्यांचे अभिनंदन केले.
