यशोदा इन्स्टिट्यूट कडून जिल्हाधिकारी श्री. संतोष पाटील यांची जन्मदिनी सदिच्छा भेट
यशोदा इन्स्टिट्यूट्सच्या शैक्षणिक कार्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून कौतुक; उदयोन्मुख अभियांत्रिकी व फार्मसी शाखांची घेतली दखल
सातारा : सातारा जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी मा. श्री. संतोष पाटील यांची ययशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स यांच्या वतीने यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ सगरे, उपाध्यक्ष डॉ. अजिंक्य सगरे यांनी सदिच्छा भेट घेऊन जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच त्यांना पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी यशोदा समूहाने शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक करत विद्यार्थीकेंद्रित उपक्रम, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आधुनिक अभ्यासक्रमांबाबत समाधान व्यक्त केले.
या प्रसंगी कुलसचिव डॉ. गणेश सुरवसे, श्री. संजय शेलार आणि श्री. संजय कदम उपस्थित होते.
यावेळी झालेल्या चर्चेमध्ये यशोदा टेक्निकल कॅम्पसला प्राप्त झालेला स्वायत्त (Autonomous) दर्जा, संस्थेची शैक्षणिक प्रगती, संशोधन, कौशल्य विकास, उद्योगाभिमुख शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम यांची माहिती मान्यवरांना देण्यात आली.
जिल्हाधिकारी मा. श्री. संतोष पाटील यांनी यशोदा समूहाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उभारलेले आधुनिक शैक्षणिक वातावरण, अत्याधुनिक प्रयोगशाळा, उद्योगाभिमुख प्रशिक्षण, उत्कृष्ट प्लेसमेंट आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी सुरू केलेले उपक्रम यांचे विशेष कौतुक केले. विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स, रोबोटिक्स, सायबर सिक्युरिटी यांसारख्या भविष्योन्मुख अभियांत्रिकी शाखा तसेच फार्मसी शिक्षणामध्ये सुरू केलेले नाविन्यपूर्ण उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी प्रा. डॉ. दशरथ सगरे यांनी संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या प्रगतीचा आढावा देत, ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी संस्था सातत्याने कार्यरत असल्याचे सांगितले. गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन, नवोपक्रम, उद्योगसहभाग आणि रोजगाराभिमुख प्रशिक्षण यावर संस्थेचा विशेष भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. अजिंक्य सगरे यांनी विद्यार्थ्यांना भविष्यातील जागतिक स्पर्धेसाठी सक्षम करण्याच्या दृष्टीने संस्थेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, उदयोन्मुख तंत्रज्ञान, जर्मन, जपानी आणि फ्रेंच भाषा प्रशिक्षण, स्टार्टअप आणि इनोव्हेशन उपक्रम, तसेच उद्योग-शैक्षणिक सहकार्याच्या माध्यमातून विविध संधी उपलब्ध करून दिल्या जात असल्याची माहिती दिली. याशिवाय फार्मसी आणि अभियांत्रिकी शिक्षणामध्ये उद्योगांच्या गरजेनुसार अभ्यासक्रम विकसित करण्यावरही भर दिला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी यशोदा समूहाच्या शैक्षणिक प्रगतीस शुभेच्छा देत, सातारा जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण, आधुनिक आणि रोजगाराभिमुख शिक्षणाची मजबूत परंपरा निर्माण करण्यात यशोदा समूहाचे योगदान निश्चितच उल्लेखनीय आहे, असे गौरवोद्गार काढले. भविष्यातही संस्था अशाच नाविन्यपूर्ण आणि समाजोपयोगी शैक्षणिक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्नेहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सदिच्छा भेटीत शिक्षण क्षेत्रातील विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. यशोदा समूहाच्या भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या असून, शिक्षण, कौशल्य विकास आणि समाजाभिमुख उपक्रमांच्या माध्यमातून संस्था सातारा जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासात अधिक प्रभावी योगदान देईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.




