अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » यशोदा इन्स्टिट्यूट चे उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे यांचा आदर्श युवा पुरस्काराने गौरव

यशोदा इन्स्टिट्यूट चे उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे यांचा आदर्श युवा पुरस्काराने गौरव

यशोदा इन्स्टिट्यूट चे उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे यांचा आदर्श युवा पुरस्काराने गौरव

आदर्श युवा पुरस्काराने यशोदा इन्स्टिट्यूट चे उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे यांचा पुणे येथे सन्मान

पुणे येथे 31 जानेवारीला पुरस्कार वितरण सोहळा संपन्न, शैक्षणिक कार्यातील नाविन्यपूर्ण बदलांची सुयोग्य दखल

यशोदा इन्स्टिट्यूट चे लवकरच यशोदा विद्यापीठामध्ये रूपांतरण करणार: प्रा.अजिंक्य सगरे

सातारा -यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे यांना यंदाचा आदर्श युवा पुरस्कार प्रधान करण्यात आला. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील नाविन्यपूर्ण बदलांची आणि प्रयोगशील कर्तव्यगारीची सुयोग्य दखल म्हणून. हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.  

पुणे येथील नामांकित जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट च्या वतीने संपन्न होणाऱ्या आठव्या संसद परिषदेमध्ये या पुरस्कारांचे वितरण संपन्न झाले. त्यावेळी आमदार हेमंत पाटील, आमदार सत्यजित तांबे, आमदार कैलास पाटील यांच्यासोबत जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष शार्दुल जाधवर हे प्रमुख उपस्थित होते. 

अभियंत्रिकीच्या तंत्रशिक्षणातील पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर सुद्धा कुटुंबातील शैक्षणिक वारसा अखंड चालू ठेवण्यासाठी सातारा सारख्या ग्रामीण भागामध्ये दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रखर प्रेरणा देणारे साताऱ्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील एक उपक्रमशील व्यक्तिमत्व म्हणजे प्रा. अजिंक्य दशरथ सगरे हे आहेत. 

प्रचंड आत्मविश्वास, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि पराकोटीची कृती शीलता आणि प्रगल्भ असा सकारात्मक दृष्टिकोन अशा विविध गुणांची अंगी खान असणारे अजिंक्य सगरे हे यशोदा शिक्षण संस्था आणि यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून सातारा सह परिसरामध्ये व्यावसायिक आणि तंत्रशिक्षणामध्ये नवनवीन बदल घडवून आणू पाहत आहेत. विद्यार्थ्यांना आणि पारंपारिक शैक्षणिक पद्धतीला बदलाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी तंत्रशिक्षणामधील अमुलाग्र बदल हाच एकमेव पर्याय असल्याचे ते मानतात. अल्पावधीमध्ये त्यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याची दखल म्हणून विविध सामाजिक शैक्षणिक संघटनांकडून त्यांना गौरविण्यात आले आहे त्यामध्ये यशवंतराव चव्हाण विचार मंच सातारा यांच्यामार्फत प्राचार्य रमणलाल शहा पुरस्कार, माध्यम समूह तर्फे जनरेशन नेक्स्ट अवॉर्ड , कॉर्पोरेट एक्सलन्स अवॉर्ड यांचा प्रामुख्याने समावेश होतो. 

शैक्षणिक क्षेत्रातील या कामगिरी सोबतच वैयक्तिक स्तरावर देखील संशोधनामध्ये विशेष रूची प्रा. अजिंक्य सगरे यांना आहे. पारंपरिक शिक्षण पद्धती आणि अत्याधुनिक अभ्यासक्रमांची सांगड घालत असताना केलेल्या नाविन्यपूर्ण बदलांच्या प्रयोगशील उपक्रमांसाठीच या व्यक्तिमत्त्वाला 31 जानेवारी 2025 रोजी पुणे येथे या पुरस्काराने गौरविण्यात आले.

प्रा.दशरथ सगरे यांचा शैक्षणिक आणि वैचारिक वारसा जोपासत यशोदा विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्धार

यशोदा इन्स्टिट्यूट चे संस्थापक प्रा. दशरथ सगरे यांना त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी नुकताच राज्यस्तरीय कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. त्यांचा शैक्षणिक आणि वैचारिक वारसा अखंड पुढे चालवण्याचा आपला निर्धार आहे तसेच यशोदा इन्स्टिट्यूट ला ‘यशोदा विद्यापीठ’ बनवण्याचा आपला मानस असल्याचे भावना देखील प्रा. अजिंक्य सगरे यांनी बोलून दाखवली

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket