अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » यशोदा कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्रा. प्राची घाडगे यांना पीएच.डी. पदवी

यशोदा कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्रा. प्राची घाडगे यांना पीएच.डी. पदवी

यशोदा कॉलेज ऑफ फार्मसीच्या प्रा. प्राची घाडगे यांना पीएच.डी. पदवी

सातारा : यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या यशोदा कॉलेज ऑफ फार्मसी, सातारा येथील प्राध्यापिका प्रा. प्राची घाडगे यांनी सुरेश ज्ञान विहार विद्यापीठ, जयपूर (राजस्थान) येथून “फायटोफार्माकोलॉजिकल स्क्रिनिंग ऑफ सिट्रस मेडिका लिन. अँड डेव्हलपमेंट ऑफ फॉर्म्युलेशन फॉर थेरप्युटिक मॅनेजमेंट ऑफ अल्झायमर डिसीज” या संशोधन विषयावर यशस्वी संशोधन पूर्ण करून पीएच.डी. पदवी संपादन केली आहे.

हे विद्यापीठ एनएएसी ‘ए+’ मानांकनप्राप्त असून, त्याच्या फार्मसी विभागाला एनआयआरएफ फार्मसी क्रमवारीत ३९ वे स्थान प्राप्त आहे. प्रा. घाडगे यांच्या संशोधनामध्ये सिट्रस मेडिका (बीजपूरा/महाळुंग) या औषधी वनस्पतीच्या फाइटोफार्माकोलॉजिकल गुणधर्मांचा अभ्यास करून अल्झायमर आजाराच्या उपचारासाठी प्रभावी औषधी फॉर्म्युलेशन विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे.

अल्झायमरसारख्या गंभीर न्यूरोडिजेनेरेटिव्ह आजाराच्या उपचार व्यवस्थापनासाठी हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरणार असून, फार्मसी क्षेत्रातील संशोधन, औषध विकास आणि औषधी वनस्पतींवरील वैज्ञानिक अभ्यासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

प्रा. प्राची घाडगे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. दशरथ सगरे, उपाध्यक्ष डॉ. अजिंक्य सगरे, प्राचार्य डॉ. व्ही. जे. चवरे, सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी तसेच विविध शैक्षणिक, सामाजिक आणि संशोधन क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket