Follow us

Home » राज्य » शिक्षण » यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर बी. आर्च. अभ्यासक्रमाचा निकाल सर्वोत्तम

यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर बी. आर्च. अभ्यासक्रमाचा निकाल सर्वोत्तम

यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर बी.आर्च. अभ्यासक्रमाचा निकाल सर्वोत्तम

यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर च्या बी आर्च अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केले. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षेमध्ये अनुजा शिंदे, ओंकार जगताप या दोन विद्यार्थ्यांनी 85.50 % गुणांसह महाविद्यालयात अव्वल स्थान पटकावले, तनवी चाकणकर 84.90%, ऋतुजा गणदास 83.50% या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांमध्ये अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावत यश संपादन केले.

आर्किटेक्चर चा पदवी अभ्यासक्रम हा पाच वर्षांचा असून, कल्पक विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या अनेक संधी उपलब्ध करून देणारा हा कोर्स विद्यार्थ्यां साठी महत्त्वाचा मानला जातो. बॅचलर ऑफ आर्किटेक्चर कोर्सचे मुख्य ध्येय व्यावसायिकता, सर्जनशीलता आणि भावनिक बुद्धिमत्तेला प्रोत्साहन देणे आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांनी एका गतिमान वातावरणात त्यांचे ज्ञान लागू करणे अपेक्षित आहे अशा सेटिंगच्या समोर येतात. विद्यार्थ्यांची शिकण्याची आवड वाढवण्याबरोबरच, हे शैक्षणिक प्रक्रियेचा एक महत्त्वाचा घटक आहे. आर्किटेक्चरच्या शिक्षणामध्ये स्थापत्यशास्त्राच्या क्षेत्रातील औपचारिक प्रशिक्षण आणि शिक्षण यांचा समावेश होतो. यात सामान्यत: शैक्षणिक अभ्यासक्रम आणि व्यावहारिक अनुभव यांचे संयोजन समाविष्ट असते.

शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी देखील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून. उच्चत्तम शैक्षणिक वातावरण आणि उज्वल करिअरच्या दृष्टीने पहिला टप्पा म्हणून विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेमध्ये आवश्यक असणाऱ्या गोष्टींची माहिती करून घेण्यासाठी यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चरला भेट द्यावी असे आवाहन प्राचार्य आर्किटेक सुहास तळेकर यांनी केले आहे.

 विद्यापीठ परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे, कार्यकारी संचालिका सौ नम्रता सगरे यांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नीरा देवघर प्रकल्पातून शेती सिंचनाचे तंतोतंत नियोजन :आमदार मकरंद पाटील यांचा पुढाकार 

नीरा देवघर प्रकल्पातून शेती सिंचनाचे तंतोतंत नियोजन आमदार मकरंद पाटील यांचा पुढाकार  खंडाळा तालुक्याचे संपूर्ण क्षेत्र ओलिताखाली  खंडाळा : खंडाळा

Live Cricket