अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » बँकिंग » वाई अर्बन बँकेस लेखापरिक्षणाचा अ वर्ग प्राप्त

वाई अर्बन बँकेस लेखापरिक्षणाचा अ वर्ग प्राप्त

वाई अर्बन बँकेस लेखापरिक्षणाचा अ वर्ग प्राप्त

वाई- येथील दि वाई अर्बन को. आँप. बँकेस आर्थिक वर्ष 2025-26 मधील वैधानिक लेखापरिक्षण तपासणीत अ वर्ग प्राप्त केला आहे. बँकेचे लेखापरिक्षण कराड येथील मान्यताप्राप्त लेखापरिक्षक मे. एसएसएसएस अँड असोसिएटसचे सीए. श्री. शिरीष गोडबोले आणि त्यांचे सहकारी यांनी लेखापरिक्षण नुकतेच पूर्ण केले. गेली दोन आर्थिक वर्ष म्हणजेच 2024-25 व 2025-26 या दोन्ही वर्षांत बँक निव्वळ नफ्यात आलेली आहे. तसेच बँकेने निव्वळ एनपीए 0 टक्के राखण्यात यश मिळविले आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष अनिल देव, उपाध्यक्ष डाँ. शेखर कांबळे व मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

ते म्हणाले, बँकेने रिझर्व्ह बँकेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले आहे. कोणत्याही नियमाचे उल्लंघन होणार नाही, याची पूर्ण दक्षता घेतली आहे. त्यामुळे या वर्षी बँकेस लेखापरिक्षणाचा अ वर्ग प्राप्त झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात सीआरआर (रोख तरलता) व एसएलआर (वैधानिक तरलता) या बाबतीत सर्व निकषांचे काटकोर पालन केले आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार सीआरएआर (भांडवल पर्याप्तता प्रमाण) 12 टक्के इतका अपेक्षित आहे. मात्र वाई अर्बन बँकेने हे प्रमाण 16.70 टक्के इतके राखले आहे. दि. 31 मार्च, 2026 अखेर बँकेकडे 325 कोटी रूपयांची कर्जे व 557 कोटी रूपयांच्या ठेवी असल्याने बँकेचा संमिश्र व्यवसाय 882 कोटी इतका आहे. रू. 335 कोटी रूपयांची बँकेची गुंतवणूक आहे. मागील आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये बँकेला 4 कोटी 56 लाख रूपये निव्वळ नफा झालेला होता. तर नुकतेच संपलेले आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये बँकेस रू. 3 कोटी 96 लाख इतका नफा झालेला आहे. प्रत्यक्षात यापेक्षा जास्त नफा झाला होता. परंतु मध्य पूर्व देशांमध्ये युध्दजन्य परिस्थितीमुळे सरकारी कर्जरोख्यांच्या भावांमध्ये घसरण झाली व त्यापोटी सर्वच बँकांना मोठी तरतूद करावी लागली. त्यामध्ये वाई अर्बन बँकेला 3.69 कोटींची तरतूद करावी लागली. तरतूद करावी लागती नसती तर बँकेला 7.65 कोटी रूपये प्रत्यक्षात नफा झाला असता, असेही त्यांनी सांगितले. बँकेची आर्थिक स्थिती सुधारणेकामी, तसेच थकीत कर्ज वसुली व व्यवसाय वाढ यासाठी बँकेचे पालक अधिकारी व शासनाच्या सहकार विभागाचे सहाय्यक निबंधक श्री. जे. पी. शिंदे यांचे मोलाचे सहकार्य असल्याचे त्यांनी सांगितले. 

गेल्या पाच वर्षांच्या काळात वैधानिक लेखापरिक्षण तपासणीत बँकेस प्रथमच अ वर्ग प्राप्त झाला आहे. अहवाल सालात व गेल्या दोन वर्षांत एनपीएवर कोणतीही तरतूद न करता सलग दोन वर्षे बँकेने नफा मिळविला आहे. चालू आर्थिक वर्षांत रू. 40 कोटी रूपये किंवा त्यापेक्षा जास्त, जुना एनपीए रक्कम वसूल करण्याचे उद्दिष्ठ बँकेने ठेवलेले आहे. तेवढी रक्कम वसूल झाली तर मागील तोटा भरून निघणार आहे. त्याचप्रमाणे बँकेचे नेटवर्थ रू. 50 कोटी पेक्षा जास्त करण्याचे उद्दिष्ट संचालक मंडळाने ठेवले आहे. त्याव्दारे बँकेला युपीआयसारखी सुविधा उपलब्ध होणार आहे. बँकेने गेल्या 4-5 वर्षांत खर्चामध्येही प्रचंड कपात केली आहे. त्याचा फायदा बँकेचा नफा वाढण्यास मदत झाली आहे. बँकेने सर्व कर्ज योजनांचे व्याजदर कमी केले आहेत. या कर्ज योजनांचा ग्राहकांनी फायदा घ्यावा. बाजारातील इतर बँकांच्या तुलनेत स्पर्धात्मक असे कर्ज व्याजदर ठेवले आहेत. आगामी काळात ठेवी व कर्ज व्यवसायाचे रू. 1000 कोटी रूपये मिश्र व्यवसायाचे उद्दिष्ट बँकेने ठेवलेले आहे, असेही त्यांनी सांगितले. 

रविवारी बँकेचा वर्धापन दिन.

बँकेचा 105 वा वर्धापन दिन रविवार दि. 21 जून 2026 रोजी साजरा होणार आहे. त्यानिमित्त बँकेत काँफी पान व सामाजिक बांधिलकीतून वाईतील बेल एअर हाँस्पिटल यांच्या सहकार्याने सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे.

या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. याप्रसंगी संचालक विवेक पटवर्धन, माधव कान्हेरे, अँड. बाळकृष्ण पंडीत, रमेश ओसवाल, महेश राजेमहाडिक, मकरंद मुळये, काशीनाथ शेलार, प्रीतम भुतकर, स्वप्नील जाधव, अशोक लोखंडे, चंद्रकांत गुजर, अँड. सुनीत्री गोवित्रीकर, नगरसेविका सौ. ज्योती गांधी, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य अविनाश जोशी, रामचंद्र कानडे, अनंत जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर काळे, सरव्यवस्थापक संतोष बागुल आदी उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket