वाई अर्बन बँकेचा वर्धापन दिन उत्साहात
वाई- येथील दि वाई अर्बन को. आँप. बँकेचा 105 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला. या निमित्ताने बँकेमध्ये रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. त्याचप्रमाणे वाईतील टायटन शोरूमच्यावतीने उपस्थितांची डोळे तपासणी मोफत करण्यात आली.
सुरूवातीस बँकेचे अध्यक्ष अनिल देव, पालक अधिकारी जनार्दन शिंदे, बँकेचे उपाध्यक्ष डाॅ. शेखर कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर काळे, माजी अध्यक्ष अरूण देव, डाँ. सुधीर बोधे, संचालक विवेक पटवर्धन, माधव कान्हेरे, अँड. बाळकृष्ण पंडीत, रमेश ओसवाल, महेश राजेमहाडीक, मकरंद मुळ्ये, काशीनाथ शेलार, प्रीतम भुतकर, स्वप्नील जाधव, अशोक लोखंडे, चंद्रकांत गुजर, संचालिका अँड. सुनिती गोवीत्रीकर, नगरसेविका सौ. ज्योती गांधी व्यवस्थापन मंडळाचे सदस्य अनिल जोशी, रामचंद्र कानडे, उपसरव्यवस्थापक आनंद पटवर्धन आदींच्या हस्ते दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. प्रारंभी संचालक श्री. रमेश ओसवाल व सौ. सुशीला ओसवाल यांच्या हस्ते श्री सत्यनारायण पूजा करण्यात आली. बँकेला अ वर्ग मिळाल्याबद्दल पालक अधिकारी यांचा अध्यक्षांच्या हस्ते गौरव करण्यात आला. नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्यासह शहरांतील अनेक मान्यवरांनी बँकेस भेट देऊन शुभेच्छा दिल्या. वाई पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन ननावरे, ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय मर्ढेकर, पत्रकार भद्रेश भाटे, विकास जाधव यांनी बँकेला अ वर्ग मिळाल्याबद्दल बँकेच्या पदाधिका-यांचा गौरव केला.
याप्रसंगी बँकेचे संचालक, अधिकारी व कर्मचारी तसेच बँकेचे हितचिंतक अशा पन्नासहून अधिक लोकांनी रक्तदान केले. तर टायटन कंपनीच्यावतीने उपस्थितांची मोफत नेत्र तपासणी केली व चष्म्याचे नंबर काढून दिले. बँकेने सामाजिक बांधिलकीतून वर्धापन दिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमांचे आयोजन केले. बँकेचे माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालकांनी उपस्थित राहून बँकेस शुभेच्छा दिल्या.




