Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » वाई अर्बन बँकेच्यावतीने विविध कर्ज योजना – अनिल देव

वाई अर्बन बँकेच्यावतीने विविध कर्ज योजना – अनिल देव

वाई अर्बन बँकेच्यावतीने विविध कर्ज योजना – अनिल देव

शिरवळ, दि. 6 – दि वाई अर्बन को. आँप. बँकेने ग्राहकांसाठी साडेनऊ टक्के इतक्या व्याजदरांत सुरू ठेवलेल्या वैयक्तिक वाहन कर्ज योजनेचा फायदा घेऊन आपले चारचाकी खरेदीचे स्वप्न साकार करावे तसेच बँकेने माफक व्याजदरात सुरू ठेवलेल्या विविध प्रकारच्या कर्ज योजनांचा फायदा घ्यावा, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष श्री. अनिल मोरेश्वर देव यांनी केले.

बँकेच्या शिरवळ शाखेच्यावतीने वाहन वितरणप्रसंगी श्री. देव बोलत होते. याप्रसंगी बँकेचे संचालक श्री. स्वप्नील जाधव यांच्या हस्ते खातेदार सौ. सुजाता भालेराव धुमाळ यांना चारचाकी डंपरचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी बँकेचे संचालक श्री. अशोक लोखंडे, चंद्रकांत गुजर, प्रितम भुतकर, भालेराव धुमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. श्री. अनिल देव म्हणाले, बँकेने नेहमीच छोटे व्यावसायिक, व्यापारी व उद्योजक यांच्या साठी साडेनऊ टक्के व्याजदराने वाहन कर्ज, साडेअकरा टक्के व्याजदराने व्यावसायिक वाहन कर्ज, तेरा टक्के दराने कॅश क्रेडीट व स्थावर मालमत्ता तारण मुदत कर्ज उपलब्ध करून दिले आहे. सोनेतारण कर्जासाठी सव्वा नऊ टक्के इतका कमी व्याजदर ठेवला आहे.

घरबांधणी कर्जावरील कर्जाचा व्याजदर देखील बँकेने कमी केलेला असून पूर्वीपेक्षा कमी व्याजदरात बंगला बांधणे, नवीन घर खरेदी करणे, नवीन फ्लॅट खरेदी करणे या कामांसाठी दहा टक्के व्याजदराने घरबांधणी कर्ज उपलब्ध करून दिलेले आहे, याचा लाभ बँकेच्या परिसरांतील आर्थिक सक्षम खातेदारांनी घ्यावा. बँकेने रू. 25 लाखांपर्यंत तारणी कर्जे सुरू ठेवली असून उद्योजक, व्यापारी यांनी बँकेशी संपर्क साधून आगामी सणासुदीच्या काळासाठी भांडवल उभारणी करावी व आपला व्यापार, उद्योग वाढवावा, असे आवाहन केले.

शाखाधिकारी राहूल चव्हाण यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आगामी सणासुदीच्या काळात व्यापारी व बँकेचे नियमिते खातेदारांनी बँकेच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, शिरवळ शाखेकडे सोनेतारण मोठ्या प्रमाणात होत असते. बँकेच्या सोनेतारण कर्ज योजनेचा फायदा घ्यावा. तसेच आपले दागदागीने सुरक्षित ठेवण्यासाठी बँकेकडील लाँकर सुविधेचाही फायदा घ्यावा, असेही सांगितले. श्री. व सौ. धुमाळ यांनी बँकेने वाहन खरेदीसाठी कर्ज उपलब्ध करून दिल्याबद्दल बँकेचे आभार मानले. याप्रसंगी श्री. महेंद्र शिंदे, सागर भागवत, रामलाल घाडगे, विलास सपकाळ, महेश चव्हाण आदी व शिरवळ येथील बँकेचे खातेदार उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सह्याद्रि कारखान्यासाठी तिरंगी लढत; 21 जागांसाठी 70 उमेदवार निवडणूक रिंगणात

Post Views: 33 सह्याद्रि कारखान्यासाठी तिरंगी लढत; 21 जागांसाठी 70 उमेदवार निवडणूक रिंगणात सह्याद्रि सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी

Live Cricket